Video: हायकोर्टच्या व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान वकिलाचा महिलेला Kiss; व्हिडिओ व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 14:24 IST2025-10-16T14:22:38+5:302025-10-16T14:24:59+5:30
Delhi High Court Lawyer Video: व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांकडून तीव्र प्रतिक्रीया उमटल्या.

Video: हायकोर्टच्या व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान वकिलाचा महिलेला Kiss; व्हिडिओ व्हायरल...
Delhi High Court Lawyer: सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एक वकील दिल्ली हायकोर्टच्या व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान एका महिलेला kiss करताना दिसतो. न्यायालयाशी संबंधित या घटनेने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली असून, लोकांनी याला “न्यायव्यवस्थेची मर्यादा भंग करणारा प्रसंग” घटना म्हटले आहे.
नेमकं काय घडलं?
बार अँड बेंचच्या रिपोर्ट्सनुसार, ही घटना दिल्ली हायकोर्टची ऑनलाइन सुनावणी सुरू होण्याआधी घडली. सर्वजण न्यायमूर्तींच्या येण्याची वाट पाहत होते, यावेळी एक वकील आपल्या घर/ ऑफिसमधून व्हर्च्युअल सेशनसाठी तयार बसले होते. यादरम्यान, एक महिला त्यांच्या जवळ आली, तेव्हा वकीलाने त्या महिलेचे चुंबन घेतले. ही संपूर्ण घटना लॅपटॉपच्या कॅमेऱ्यात कैद झाली. आपला कॅमेरा ऑन आहे, हे त्या वकीलाच्या लक्षात आले नाही.
Welcome to Digital India Justice 😂
— ShoneeKapoor (@ShoneeKapoor) October 15, 2025
Court is online… but judge forgot it’s LIVE! ☠️
When tech meets tradition
— and the camera off button loses the case! 🤣 pic.twitter.com/1GbfOFQ6w7
सोशल मीडियावर प्रतिक्रीया
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी याला “लाजीरवाणे कृत्य” ठरवत घटना न्यायपालिकेच्या प्रतिष्ठेचा आणि ऑनलाइन सुनावणीच्या शिस्तीचा भंग असल्याचे म्हटले. अनेकांनी संबंधित वकिलावर अनुशासनात्मक कारवाईची मागणी केली आहे. त्या वकीलावर बार कौन्सिलकडून शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.