Memes On Delhi Election Results : मनोज तिवारी अंडरग्राऊंड तर ट्रम्प केजरीवालांची घेणार मदत, सोशल मीडियात मीम्सचा पाऊस!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 09:53 AM2020-02-11T09:53:39+5:302020-02-11T09:57:35+5:30

Delhi Election Results 2020 Memes : 'आप'चं पुन्हा दिल्लीत सरकार बसणार असल्याचं स्पष्ट चित्र आहे. त्यावरून सोशल मीडियात मीम्सही व्हायरल झाले आहेत.

Delhi Election Results 2020 Memes : How social media is reacting to the Delhi results | Memes On Delhi Election Results : मनोज तिवारी अंडरग्राऊंड तर ट्रम्प केजरीवालांची घेणार मदत, सोशल मीडियात मीम्सचा पाऊस!

Memes On Delhi Election Results : मनोज तिवारी अंडरग्राऊंड तर ट्रम्प केजरीवालांची घेणार मदत, सोशल मीडियात मीम्सचा पाऊस!

googlenewsNext

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे कल हाती आले असून त्यानुसार 'आप' म्हणजेच आम आदमी पार्टीने जोरदार मुसंडी मारत आघाडी घेतली आहे. साऱ्या देशाचे लक्ष या निकालाकडे लागले होते कारण भाजपाने विजयासाठी दिल्लीत जोरदार मोर्चेबांधणी केली होती. पण त्यांनी लावलेला जोर आणि त्यांनी घेतलेल्या आघाडीत बरीच तफावत आहे. जरी निकाल पूर्णपणे हाती आले नसले तरी अपेक्षेप्रमाणे 'आप'चं दिल्लीत सरकार बसणार असल्याचं स्पष्ट चित्र आहे. त्यावरून सोशल मीडियात मीम्सही व्हायरल झाले आहेत.

भाजपाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी भाजपा बहुमताने सत्तेत येईल आणि 55 जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला होता. मनोज तिवारी यांनी 'मी या निकालाबाबत आजिबात चिंताग्रस्त नाही. आजचा दिवस भाजपासाठी चांगला असेल असा मला विश्वास आहे. आज आम्ही दिल्लीत सत्तेत येणार आहोत. भाजपाने 55 जागा जिंकल्यास आश्चर्य वाटायला नको' असं म्हटलं होतं. पण चित्र वेगळंच बघायला मिळालं. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या कामांना जनतेने साथ दिली आहे.

Web Title: Delhi Election Results 2020 Memes : How social media is reacting to the Delhi results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.