शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

David Warner Video: डेव्हिड वॉर्नरची 'स्टायलिश' फाईट, पण खरा हिरो कोण? फॅन्सना 'चॅलेंज'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 17:48 IST

पाहा, तुम्हाला ओळखता येतोय का फिल्मचा हिरो?

David Warner Video: ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर आणि दिल्ली कॅपिटल्सचा स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नर कायम चाहत्यांचे सोशल मीडियावर मनोरंजन करताना दिसतो. बॉलिवूड असो किंवा दाक्षिणात्य चित्रपट असो, वॉर्नर त्या चित्रपटातील ट्रेंडिंग गोष्टींशी संबंधित काही ना काही सोशल मीडियावर पोस्ट करत राहतो. त्याने मधल्या काळात पुष्पा चित्रपट हिट झाला असताना त्यातील बरेच छोटे मोठे व्हिडीओ स्वत:चा चेहरा लावून पोस्ट केले होते. तसेच काही दिवसानंतर KGF-2 या ब्लॉकबस्टर चित्रपटातील 'रॉकी भाई'च्या अवतारातही डेव्हिड वॉर्नर दिसला होता. पण आता मात्र डेव्हिड वॉर्नर एका जुन्या साऊथ इंडियन चित्रपटातील अँक्शन सीन मजेशीर पद्धतीने साकारताना दिसतोय.

व्हिडीओमध्ये नक्की काय?

डेव्हिड वॉर्नरने एका चित्रपटातील व्हिडीओ क्लिप पोस्ट केली आहे. या व्हिडीओमध्ये त्याने हिरोच्या चेहऱ्याच्या जागी स्वत:चा चेहरा लगावला आहे. या व्हिडीओ सीन मध्ये डेव्हिड वॉर्नरचा चेहरा लावलेला हिरो खलनायकाच्या गँगची धुलाई करताना दिसत आहे. या व्हिडीओला लाईक्स तर मिळाले आहेतच. पण वॉर्नरने या व्हिडीओच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना एक प्रश्न विचारला आहे. वॉर्नरने नक्की कोणत्या दाक्षिणात्य हिरोच्या जागी स्वत:चा चेहरा लावला आहे, असा प्रश्न त्याने चाहत्यांसाठी विचारला असून त्यावर अनेकांनी बरोबर उत्तरे दिली आहेत. पाहा तुम्हाला माहितीये का हा चित्रपट आणि त्या चित्रपटाचा हिरो? पाहा व्हिडीओ-

डेव्हिड वॉर्नर सतत विविध अभिनेत्यांचे व्हिडीओ पोस्ट करत असतो. कोरोना काळात वॉर्नरने असे मजेशीर व्हिडीओ पोस्ट करून साऱ्यांचेच मनोरंजन केले होते. सनरायजर्स हैदराबादमधून खेळताना तो दाक्षिणात्य चित्रपटांचा फॅन होता. पण नंतर दिल्लीच्या संघाकडे गेल्यानंतरही त्याचं साऊथच्या चित्रपटांचे वेड अद्याप कमी झालेलं नाही. तो अजूनही त्या चित्रपटातील छोटे छोटे व्हिडीओ शोधून त्यावर व्हिडीओ पोस्ट करत असतो. दरम्यान, आजचा व्हिडीओ हा साऊथ स्टार अलू अर्जुन ( Allu Arjun ) याच्या अला वैकुंठपुरमलो ( Ala Vaikunthapurramuloo ) या चित्रपटातील आहे. त्यावर वॉर्नरने स्वत:चा चेहरा लावून धमाल व्हिडीओ पोस्ट केला आहे.

टॅग्स :David Warnerडेव्हिड वॉर्नरSocial Mediaसोशल मीडियाAllu Arjunअल्लू अर्जुनSocial Viralसोशल व्हायरल