A Daughter searching fo a man for his 56 year old single mother, People praise her thoughts | क्या बात! आणखी एक तरूणी ५६ वर्षीय आईसाठी शोधतीये जोडीदार, कुणी आहे का नजरेत?
क्या बात! आणखी एक तरूणी ५६ वर्षीय आईसाठी शोधतीये जोडीदार, कुणी आहे का नजरेत?

काही दिवसांपूर्वीच एका मुलीने ट्विट करून ती तिच्या आईसाठी नवरा मुलगा शोधत असल्याचं सांगितलं होतं. आस्था शर्मा असं या मुलीचं नाव असून तिचं सोशल मीडियातून कौतुकही करण्यात आलं होतं. आता तिच्याकडून प्रेरणा घेऊन आणखी एक मुलगी तिच्या आईच्या लग्नासाठी वर शोधत आहे. 

आता मोहिनी विज नावाच्या एका तरूणीने एक ट्विट केलं आहे. त्यात तिने सांगितले की, ती तिच्या ५६ वर्षीय आईसाठी वर शोधत आहे. त्याचं वय ५५ ते ६० दरम्यानचं असावं. ही व्यक्ती चांगल्या स्वभावाची, शाकाहारी, नशा न करणारी आणि वडिलांची जबाबदारी समजणारी असावी.

या पोस्टमध्ये मोहिनीने आस्थाच्या पोस्टचाही उल्लेख केला आहे. आस्थाच्या पोस्टवरून प्रेरणा घेऊन ती हे करत असल्याचं बोलली. मोहिनीची ही पोस्ट काही वेळातच व्हायरल झाली आहे. इतकेच नाही तर काही स्थळंही यायला सुरूवात झाली आहे. 

३१ ऑक्टोबरला आस्था वर्माने तिच्या आईसोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्याला तिने कॅप्शन दिलं होतं की, ती तिच्या ५० वर्षीय आईसाठी सुंदर, शाकाहारी आणि संपन्न पती शोधत आहे. यानंतर ट्विटरवर ही पोस्ट व्हायरल झाली होती. अनेकांनी स्थळंही सुचवली होती. 


Web Title: A Daughter searching fo a man for his 56 year old single mother, People praise her thoughts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.