VIDEO : मुलीने बाबांकडे धरला सावत्र आईचा हट्ट, म्हणाली - करिना कपूरसारखी आई हवी....
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 13:54 IST2021-09-06T13:53:12+5:302021-09-06T13:54:59+5:30
Social Viral : तिचे बाबा तिला आधी विचारतात की, कशी सावत्र आई पाहिजे. करिश्मा कपूरसारखी की करिना कपूरसारखी? त्यावर मुलगी करिना कपूरसारखी आई हवी असल्याची मागणी करते.

VIDEO : मुलीने बाबांकडे धरला सावत्र आईचा हट्ट, म्हणाली - करिना कपूरसारखी आई हवी....
लहान मुलं कधी कधी आई-वडिलांवर रागावतात आणि रागारागात काहीही बोलतात. इतकंच नाही तर लहान मुलं दुसरे आई-बाबा हवेत म्हणूनही डिमांड करतात. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. ज्यात एक मुलगी बाबाकडे दुसरी आई आणण्याची डिमांड करत आहेत. आईवर रागावलेली मुलगी बाबाला सतत सांगते की, तिला सावत्र आई हवी आहे. असा ती नांदाच लावते. अशात बाबा तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात की, सावत्र आई आणायची नाही.
लखनौमधील बर्फी टीव्ही नावाने एका यूट्यूब चॅनलवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. साधारण ३ ते ४ वर्षाची मुलगी बाबाकडे सावत्र आई आणण्याचा हट्ट करते आहे. तिचं म्हणणं आहे की, माझी आई चांगली नाहीये, मला सावत्र आई हवी आहे. यावर तिचे बाबा तिला आधी विचारतात की, कशी सावत्र आई पाहिजे. करिश्मा कपूरसारखी की करिना कपूरसारखी? त्यावर मुलगी करिना कपूरसारखी आई हवी असल्याची मागणी करते.
मुलीला तिच्या बाबाने वेगवेगळ्या प्रकारे आईवर प्रेम करण्यासाठी आणि सावत्र आई न आणण्यासाठी समजावलं. ५ मिनिटांपेक्षा जास्त वेळेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुलीचे क्यूट एक्सप्रेशन आणि सावत्र आई पुन्हा पुन्हा मागणी पाहून लोक पोट धरून हसत आहेत. इतकंच नाही तर तिच्या बाबांचं बोलणं ऐकून ती रडूही लागते.