१८० किमी वेगाने धावणाऱ्या कारवर झोपला, विचित्र स्टंट करुन तरुणाचे झाले 'हे' हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 02:55 PM2021-09-06T14:55:20+5:302021-09-07T15:16:24+5:30

प्रत्येकाला वाटतं की कुछ तुफानी म्हणजे काहीतरी भन्नाट करुन दाखवावं. त्यामुळे प्रसिद्धी मिळते खरी पण काहीवेळा तुम्ही यामुळे गोत्यातही येऊ शकता. रशियामधील (Russia) एका तरुणासोबतही असंच घडलं. हा तरुण १८० प्रति तास किमी वेगाने पळणाऱ्या गाडीवर जाऊन झोपला. त्यानंतर जे काही झालं ते तुम्हीच पाहा...

danil russian man slept on 180 km per hour car speed video goes viral | १८० किमी वेगाने धावणाऱ्या कारवर झोपला, विचित्र स्टंट करुन तरुणाचे झाले 'हे' हाल

१८० किमी वेगाने धावणाऱ्या कारवर झोपला, विचित्र स्टंट करुन तरुणाचे झाले 'हे' हाल

Next

प्रत्येकाला वाटतं की कुछ तुफानी म्हणजे काहीतरी भन्नाट करुन दाखवावं. त्यामुळे प्रसिद्धी मिळते खरी पण काहीवेळा तुम्ही यामुळे गोत्यातही येऊ शकता. रशियामधील (Russia) एका तरुणासोबतही असंच घडलं. हा तरुण १८० प्रति तास किमी वेगाने पळणाऱ्या गाडीवर जाऊन झोपला. त्यानंतर जे काही झालं ते तुम्हीच पाहा...

रशियाचा सोशल मिडिया इन्फ्लुयंसर डेनिल मायसनिकोव यानं भरधाव वेगातील कारवर झोपत भयंकर स्टंट केला. स्वतःचा हा व्हिडिओही त्यानं सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले, कारण स्वतःच जीव अशा प्रकारे कोणी धोक्यात कसं टाकू शकतं, असा प्रश्न सर्वांना पडला.

डेनिल मायनिकोव एका भरधान वेगातील कारवर होता. त्यानं या कारवर व्यवस्थित चिकटुन राहण्यासाठी स्वत:ला दोरी आणि टेपच्या साह्य्याने बांधले होते. टेपच्या सहाय्यानं त्यानं आपलं संपूर्ण शरीर कारच्या बाहेरच्या भागाला बांधलं होतं. डेनिलनं या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला.

इन्स्टाग्रामवर डेनिल याचे तब्बल ८ लाख फॉलोअर्स आहेत. डेनिलनं अपलोड केलेला हा व्हिडिओ तब्बल अडीज लाख लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओमध्ये डेनिलनं स्वतःला टेपनं बांधतानाही दाखवलं आहे.व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी या डेनिल विरोधात तपास सुरू केला आहे.

Web Title: danil russian man slept on 180 km per hour car speed video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.