VIDEO : रेल्वे ट्रॅकवर पडली होती सायकल, रेल्वे आली तर झाला सिनेमातील सीनसारखा धमाका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 17:45 IST2021-09-21T17:44:09+5:302021-09-21T17:45:55+5:30
तुम्ही या व्हिडीओत बघू शकता की, कशाप्रकारे शेवटी संपूर्ण प्लॅटफॉर्ममध्ये धुरच धुरच दिसतो. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, ही घटना रात्री १० वाजताची आहे.

VIDEO : रेल्वे ट्रॅकवर पडली होती सायकल, रेल्वे आली तर झाला सिनेमातील सीनसारखा धमाका
अमेरिकेतील क्वींस सबवे स्टेरीवर एक सायकल रेल्वे ट्रॅकवर पडली होती. कुणीही ही सायकल उचलण्यासाठी जात नव्हतं. कारण एक रेल्वे जवळच आली होती. जशी रेल्वे सायकलवरून गेली तर रेल्वे ट्रॅकवर आगीच्या ठिणक्या उडाल्या होत्या. आणि नंतर आग लागली.
हा धक्कादायक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. यात बघू शकता की, एक निळ्या रंगाची भाड्याची सिटी बााइक रेल्वे ट्रॅकवर पडलेली दिसते. अशात एका बाजूने वेगाने एक रेल्वे येते. ती जशी बाइकवरून जाते तिथे आगीच्या ठिणग्या पेटतात आणि नंतर आगीचा एक धमाका होतो.
तुम्ही या व्हिडीओत बघू शकता की, कशाप्रकारे शेवटी संपूर्ण प्लॅटफॉर्ममध्ये धुरच धुरच दिसतो. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, ही घटना रात्री १० वाजताची आहे. जेव्हा एका अज्ञात व्यक्तीची सायकल रेल्वे ट्रॅकवर पडली होती. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.