VIDEO : मगरीने हवेत झेप घेत तोंडात पकडलं उडतं ड्रोन, चावताच झाला स्फोट आणि...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 16:42 IST2024-12-18T16:34:06+5:302024-12-18T16:42:47+5:30
Crocodile Drone Video : सध्या मगरीचा एक वेगळाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात एका मगरीने चक्क ड्रोन खाल्लं.

VIDEO : मगरीने हवेत झेप घेत तोंडात पकडलं उडतं ड्रोन, चावताच झाला स्फोट आणि...
Crocodile Drone Video : सोशल मीडियावर नेहमीच प्राण्यांचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हे मजेदार तर काही धक्कादायक असतात. काही व्हिडिओंमध्ये प्राण्यांसोबत घडलेल्या धक्कादायक दुर्घटनाही बघायला मिळतात. आतापर्यंत मगरींचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण सध्या मगरीचा एक वेगळाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात एका मगरीने चक्क ड्रोन खाल्लं.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामच्या 'droneshakk' अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. मगरीने हवेत झेप घेत ड्रोन तोंडात पकडलं. त्यानंतर मगरीच्या तोंडातून धूर निघाला. म्हणजे ड्रोनची बॅटरी फुटल्याचा हा संकेत होता.
व्हिडिओत बघू शकता की, ड्रोन एका दलदलीवरून उडत आहे आणि ड्रोनचा ऑपरेटर जॉर्ज मगरीच्या जवळ जाऊन शॉट घेण्याचा प्रयत्न करत होता. मगरीने झडप मारत ड्रोनला तोंडात पकडलं. तर व्हिडिओत मागून लोकांच्या ओरडण्याचा आवाज येतो.
या घटनेवरून हेही दिसून येतं की, जंगलातील प्राण्यांना अशा गोष्टींची चीड असते, ज्या त्यांच्या नॅचरल घरांमध्ये शिरतात. जेव्हा मगरीने ड्रोन चावलं तेव्हा त्यातील लिथिअम-आयन बॅटरी फुटली. ज्यामुळे गॅस आणि उष्णतेचं उत्सर्जन झालं. अशात मगरीला जखमही होऊ शकली असती.
या व्हिडिओवर लोकांनी संताप व्यक्त केला असून प्राण्यांना त्रास देणं बंद करण्याचा सल्ला दिला आहे. या घटनेवरून हेही लक्षात येतं की, आपण प्राण्यांपासून दूर राहिलं पाहिजे आणि प्राण्यांची काळजी घेतली पाहिजे.