'पाण्यात राहून मगरीशी वैर..!' जग्वारने म्हणीचा अर्थच बदलला; पाहा थरारक व्हिडिओ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 18:35 IST2022-08-18T17:45:33+5:302022-08-18T18:35:07+5:30
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून, मगरीच्या शिकारीचा थरार कैमेऱ्यात कैद झाला आहे.

'पाण्यात राहून मगरीशी वैर..!' जग्वारने म्हणीचा अर्थच बदलला; पाहा थरारक व्हिडिओ...
Viral Video: 'पाण्यात राहून मगरीशी वैर नाही करायचं,' ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. मगर जमिनीवर जितकी धोकादायक आहे, त्यापेक्षा कैक पटीने ती पाण्यात धोकादायक असते. पाण्यामध्ये आलेल्या कोणत्याही प्राण्याला मगर जिवंत परत जाऊ देत नाही. एखादा प्राणी मगरीच्या तावडीतून सुटला, तर तो खूप नशीबवान असल्याचे समजा. पण, सध्या याच्या उलट एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक जग्वार नदीत उडी मारुन चक्क मगरीची शिकार करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये मगर नदीतून जात आहे, तेवढ्यात एक जग्वार टेकडीवरुन पाण्यात उडी मारतो आणि मगरीचा मान आपल्या शक्तीशाली जबड्यात पकडून तिला पाण्याबाहेर आणतो. धोकादायक असलेली मगर यावेळी अतिशय लाचार दिसते. सोमवारी ट्विटरवर फिगेन नावाच्या युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. पण, मूळात हा व्हिडिओ वाहसी हयातलर नावाच्या युजरने दोन वर्षांपूर्वी ट्विटरवर पोस्ट केला होता. सध्या हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे.
व्हिडिओ पहा:
OMG what a power!! pic.twitter.com/LHZazN2zwP
— Figen (@TheFigen) August 14, 2022
42-सेकंदांच्या क्लिपमध्ये अन्नसाखळीतील दोन हिंस्र प्राणी जगण्यासाठी जीवाचं रान करताना दिसत आहेत. या अतिशय धोकादायक अशा लढाईत अखेर जग्वार जिंकतो आणि मगरीला जबड्यात पकडून घेऊन जातो. व्हिडिओ शेअर केल्यापासून 2.6 दशलक्ष व्ह्यूज आणि 27 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. सुमारे 4 हजार युजर्सनी हा व्हिडिओ ट्विटरवर पुन्हा शेअर केला आहे.