नदीत आंघोळ करत असलेल्या व्यक्तीला मगरीनं पकडलं, बघा त्यानं कसा वाचवला स्वत:चा जीव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 14:20 IST2025-02-24T14:19:49+5:302025-02-24T14:20:20+5:30

Viral Video : व्यक्ती जशी पाण्यात उतरली तेव्हा त्याला एक मगरीनं पाहिलं आणि त्याच्याकडे येऊ लागली होती. काही क्षणात मगरीनं त्याचा पाय आपल्या जबड्यात पकडला..

Crocodile caught a person swiming in the river watch how he saved his life | नदीत आंघोळ करत असलेल्या व्यक्तीला मगरीनं पकडलं, बघा त्यानं कसा वाचवला स्वत:चा जीव!

नदीत आंघोळ करत असलेल्या व्यक्तीला मगरीनं पकडलं, बघा त्यानं कसा वाचवला स्वत:चा जीव!

Viral Video : मेक्सिकोमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे नशेत असलेल्या एका व्यक्तीनं कशाचाही विचार न करता मगरी असलेल्या पाण्यात उडी मारली. दारूच्या नशेत ही व्यक्ती आरामात स्वीमिंग करत होती, पण त्याला जराही अंदाज नव्हता की, तो किती मोठ्या अडचणीत सापडणार आहे. जेव्हा स्थानिक लोकांनी त्याला पाण्यात बघितलं तर त्याला बाहेर येण्यासाठी सांगण्यास ओरडू लागले होते. पण तोपर्यंत मगर आली होती.

व्यक्ती जशी पाण्यात उतरली तेव्हा त्याला एक मगरीनं पाहिलं आणि त्याच्याकडे येऊ लागली होती. काही क्षणात मगरीनं त्याचा पाय आपल्या जबड्यात पकडला आणि त्याला पाण्यात ओढण्याचा प्रयत्न करू लागली होती. मात्र, व्यक्तीचं बलवत्तर होतं, तो मगरीच्या तावडीतून सुटण्यासाठी प्रयत्न करत राहिला. हा व्हिडीओ एक्सवर @Morbidful नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

सामान्यपणे मगर आपली शिकार पाण्यात बुडवून मारते. पण या व्यक्तीचं नशीब चांगलं होतं. कशीतरी त्यानं मगरीच्या तावडीतून स्वत:ची सोडवणूक केली. तो जखमी झाला असूनही पाण्यातून बाहेर येण्यास यशस्वी झाला. नंतर स्थानिक लोक त्याच्या मदतीसाठी धावून आले आणि त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्याची स्थिती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं.

या घटनेची सोशल मीडिया चर्चा सुरू आहे आणि व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो बघून लोक या व्यक्तीच्या मूर्खपणावर बोलत आहेत, सोबतच त्याचं नशीब बघून अचंबितही झाले आहेत. तसेच लोकांना यातूनही हेही दिसून आलं की, मगरी असलेल्या पाण्यापासून दूर राहिलं पाहिजे. 

Web Title: Crocodile caught a person swiming in the river watch how he saved his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.