Viral Video: मासेमारी करत होतं कपल, मगरीने असा काही हल्ला केला जीव गमावणारच होते पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 14:02 IST2022-04-29T16:12:56+5:302022-05-10T14:02:42+5:30
खोल नदीत गेलेल्या कपलला मासेमारी करण्याची हौस चांगलीच महागात पडली. मासेमारी करताना त्यांच्यावर जीव गमवायची पाळी आली.

Viral Video: मासेमारी करत होतं कपल, मगरीने असा काही हल्ला केला जीव गमावणारच होते पण...
अनेकांना पाण्यात मासेमारी करण्याची हौस असते. त्यासाठी ते अगदी खोल समुद्रातही जातात. असंच खोल नदीत गेलेल्या कपलला मासेमारी करण्याची हौस चांगलीच महागात पडली. मासेमारी करताना त्यांच्यावर जीव गमवायची पाळी आली.
मगर म्हणजे अत्यंत हिंस्त्र प्राणी. पाण्यात राहुन माश्याशी वैर करु नये असं म्हणतात पण खरंतर पाण्यात राहुन मगरीशी पंगा घेऊ नये. असंच एका कपलने मगरीशी पंगा घेतला. तो त्यांना इतका महागात पडला की पुन्हा मासेमारी करायला धजावणार नाहीत.
तुम्ही व्हिडिओत पाहु शकता की कपल मस्तपैकी नदीत बोटीवर मासेमारी करत आहे. अचानक त्यांना पाण्यात मगर दिसते. ती त्यांचाच दिशेने येत असते. हे कपल तिच्यापासुन वाचण्याएवजी तिचा व्हिडिओ काढत बसले. अन् मग मगरीने त्यांच्या बोटीवरच हल्ला केला. ते कपलं कसंबस त्यातून वाचलं पण हा व्हिडिओ पाहुन तुमचा थरकाप उडेल हे नक्की.