आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 16:57 IST2025-07-13T16:56:49+5:302025-07-13T16:57:42+5:30

Andre Russell wife workout video: रसेलची पत्नी एक मॉडेल आणि फॅशन ब्लॉगर आहे

cricketer Andre Russell wife jassym lora hot workout In the air video viral trending social media | आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल

आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल

IPL मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) खेळणारा अष्टपैलू क्रिकेटपटू आंद्रे रसेल उत्तुंग षटकार मारण्यासाठी ओळखला जातो. अलिकडेच, त्याने मेजर लीग क्रिकेट (MLC 2025) मध्ये लॉस एंजेल्स नाईट रायडर्सकडून खेळताना चमकदार कामगिरी केली. परंतु त्याचा संघ पहिल्या फेरीतच स्पर्धेबाहेर पडला. वेस्ट इंडिजच्या या दिग्गज अष्टपैलू खेळाडूची पत्नी जेसिम लोराही विविध कारणाने चर्चेत असते. ती एक मॉडेल आणि फॅशन ब्लॉगर आहे. जेसिम इंस्टाग्रामवर फॅशन इन्फ्लुएंसर म्हणून ओळखली जाते. सोशल मीडियावरही ती खूप लोकप्रिय आहे. सध्या तिचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती एका अनोख्या पद्धतीने वर्कआऊट करताना दिसतेय.


रसेलच्या पत्नीचा अनोखा फिटनेस

आंद्रे रसेलची पत्नी जेसिम हिने तिच्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. यामध्ये ती हवाई पद्धतीची कसरत करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती छताला बांधलेल्या कापडाच्या मदतीने हवेत लटकून व्यायामप्रकार करताना दिसतेय. सुरुवातीला ती तिचे पाय कापडात अडकवते. नंतर कापडाच्या मदतीने शरीराचा भार पायावर घेत आणि पाय दुमडून हवेत फ्लिप मारून शरीराचा समतोल साधत हवेत आसन पूर्ण करते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पाहा व्हिडीओ-


बोल्ड फॅशन फोटोजसाठी चर्चेत

मियामीची रहिवासी असलेली जेसिम ही अमेरिकन फॅशन मॉडेल आणि ब्लॉगर आहे. ती इंस्टाग्रामवर वेगवेगळ्या ब्रँडसाठी बोल्ड फोटोशूट करते. ती सोशल मीडियावर फॅशन इन्फ्लुएन्सर म्हणूनही प्रसिद्ध आहे. लोराचे इंस्टाग्रामवर ३ लाख ५० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.


रसेल-जेसिम यांचं २०१६ मध्ये झालं लग्न

आंद्रे रसेल आणि जेसिमचे लग्न जुलै २०१६ मध्ये झाले. जानेवारी २०२० मध्ये जेसिम आणि रसेल आई-बाबा झाले. तिच्या मुलीचे नाव आलिया रसेल आहे. रसेल जगभरातील विविध लीग क्रिकेटमध्ये भाग घेतो. त्यात बऱ्याच वेळा जेसिम त्याला चिअर करण्यासाठी स्टेडियममध्ये हजर असते.


Web Title: cricketer Andre Russell wife jassym lora hot workout In the air video viral trending social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.