OYO रूमचा दरवाजा बंद करणं विसरलं कपल, लोक बघू लागले लाइव्ह शो; पण एकानं वाचवलं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 15:22 IST2025-04-14T15:19:14+5:302025-04-14T15:22:07+5:30
Viral Video : एक कपल OYO रूममध्ये रोमान्स करण्यात इतकं बिझी होतं की त्यांचे खाजगी क्षण सगळ्या जगानं पाहिले. हे

OYO रूमचा दरवाजा बंद करणं विसरलं कपल, लोक बघू लागले लाइव्ह शो; पण एकानं वाचवलं...
Viral Video : अनेकदा उत्साहाच्या भरात लोक अशा काही चुका करतात ज्या त्यांच्यासाठी अडचणीच्या किंवा लाजिरवाण्या ठरतात. एका कपलच्या अशाच एका चुकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात OYO मध्ये गेलेल्या एका कपलची चूक ते आयुष्यभर लक्षात ठेवतील. एक कपल OYO रूममध्ये रोमान्स करण्यात इतकं बिझी होतं की त्यांचे खाजगी क्षण सगळ्या जगानं पाहिले. हे कपल OYO रूमचा दरवाजा बंद करणं विसरलं. त्यानंतर जे झालं ते सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
OYO हॉटेल रूमचा दरवाजा उघडाच आणि मग...
व्हायरल झालेल्या या व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, एका मेट्रो स्टेशनच्या अगदी समोर एका OYO हॉटेलच्या रूमचा बाल्कनीचा दरवाजा उघडा आहे आणि आत कपल रोमान्य करण्यात बिझी आहे. त्यांना जराही अंदाज नाही की, त्यांचे हे खाजगी क्षण मेट्रो स्टेशनवर उभे असलेल्या अनेकांना पाहिले.
अशातच मेट्रो स्टेशनवर उभ्या एका तरूणानं मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून ओरडून त्याना सांगितलं की, "भावा, दरवाजा बंद करून घे". आतील तरूणानं हा आवाज ऐकताच दरवाजा बंद केला. हा क्षण एका व्यक्तीनं कॅमेरात कैद केला. जो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या मजेदार कमेंट्स करत आहेत. काही लोक या रूमलहा OYO ओपन थिएटर म्हणत आहेत, तर काही लोक म्हणाले की, मेट्रो तिकीटसोबत रोमॅंटिक शो बोनस म्हणू लागले. एकानं लिहिलं की, "OYO वाल्यान्या आता एक साइन बोर्डही लावावं लागेल की, दरवाजा बंद करणं विसरू नका". हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @mahiiii._.17 नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आणि लाइक केला.