धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 19:29 IST2025-12-21T19:27:59+5:302025-12-21T19:29:03+5:30
Namo Bharat Train Couple Obscene Video: धावत्या नमो भारत ट्रेनमध्ये एका प्रेमीयुगुलाने अश्लील कृत्य केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
गाझियाबाद- मेरठ दरम्यान धावणाऱ्या नमो भारत ट्रेनमध्ये एका प्रेमीयुगुलाने अश्लील कृत्य केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गाझियाबाद पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २४ नोव्हेंबर रोजी घडली आहे. ट्रेन मोदीनगर (उत्तर) स्टेशनच्या दिशेने जात असताना एका तरुण आणि तरुणीने डब्यातच अश्लील कृत्य केले. ट्रेनमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा सर्व प्रकार कैद झाला. धक्कादायक बाब म्हणजे, हे सीसीटीव्ही फुटेज कोणीतरी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केली.
या प्रकरणाची दखल घेत एनसीआरटीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली की, "हा व्हिडिओ गेल्या महिन्यातील आहे. व्हिडिओमध्ये दिसणारे तरुण-तरुणी हे प्रवासी असून आमचे कर्मचारी नाहीत. या प्रकरणाची आम्ही अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आणि प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येईल."
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गाझियाबाद पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. "या संदर्भात अद्याप रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत तक्रार मिळालेली नाही. मात्र, संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारींना सखोल चौकशी करण्याचे आणि रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल", अशी माहिती पोलिसांनी दिली.