व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 17:11 IST2025-08-12T17:10:30+5:302025-08-12T17:11:15+5:30
लोक रील बनवण्यासाठी काहीही करत आहेत. जीव धोक्यात घालून केलेले कारनामे पाहायला मिळत आहेत. असाच एक व्हिडीओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे.

व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
लोक स्वतःला सोशल मीडियावर व्हायरल करण्यासाठी कोणताही आणि कसाही कंटेंट तयार करत आहेत. लोकांना आता ना कशाची भीती वाटते ना त्यांच्या जीवाची पर्वा. आता लोक फक्त व्हायरल होण्यासाठी नवनवीन मार्ग शोधत आहेत. लोक रील बनवण्यासाठी काहीही करत आहेत. जीव धोक्यात घालून केलेले कारनामे पाहायला मिळत आहेत. असाच एक व्हिडीओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक कपल रील बनवण्यासाठी एकमेकांना मिठी मारून कालव्यात उडी मारताना दिसत आहे. जे पाहून कोणाच्याही हृदयाची धडधड वाढेल. या व्हायरल व्हिडिओमध्ये, तुम्ही पाहू शकता की कपल कालव्याच्या काठावर उभं आहे आणि बरेच लोक कालव्याभोवती उभे असलेले देखील दिसत आहेत. त्याच वेळी, जवळ उभा असलेला एक व्यक्ती त्यांचा व्हिडीओ बनवत आहे.
ना लाईफ की फिकर
— Natasha Yadav (@imnatasha09) August 8, 2025
ना पानी का डर..
बस Reels बननी चाहिए सर! 😒 pic.twitter.com/fsbkGXO29X
कपल एकमेकांना मिठी मारतात आणि नंतर एकत्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात उडी मारतात. जवळ उभे असलेले लोक त्यांना पाहत राहतात. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. @imnatasha09 नावाच्या युजरने व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये जीवाची चिंता नाही, पाण्याची भीती नाही... फक्त रील बनवताहेत! असं म्हटलं आहे.
व्हिडीओ आतापर्यंत ४ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि ८०० हून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे. लोक व्हिडिओवर खूप कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने नाटक चालू असल्याचं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने रीलची नशा असल्याचं सांगितलं. तर काही जणांनी व्हायरल होण्याचं भूत डोक्यावर असल्याचं म्हटलं आहे.