डर के आगे जीत है! कोरोनाच्या भीतीने महिलेने घरातील किराणा माल अन् नोटाही खचाखच काढल्या धुवून!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 15:38 IST2020-03-31T15:37:02+5:302020-03-31T15:38:12+5:30

सगळे कोरोना व्हायरसचे अपडेट चेक करत राहतात. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लोक वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत.

Coronavirus : This women puts groceries in bathtub to sanitize them api | डर के आगे जीत है! कोरोनाच्या भीतीने महिलेने घरातील किराणा माल अन् नोटाही खचाखच काढल्या धुवून!

डर के आगे जीत है! कोरोनाच्या भीतीने महिलेने घरातील किराणा माल अन् नोटाही खचाखच काढल्या धुवून!

भीती माणसाकडून काय काय करवून घेते याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. कोरोना व्हायरस लोकांच्या मनात फारच भीती आहे. लोकांना कोरोनाशिवाय दुसरं काही दिसत नाहीये. काहींना तर स्वप्नातही कोरोना दिसत असतील.

सगळे कोरोना व्हायरसचे अपडेट चेक करत राहतात. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लोक वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत. आता या महिलेचच बघा ना...या महिलेने घरातील सर्व किराणा माल सॅनिटाइज करण्यासाठी बाथटबमध्ये टाकला.

Evie Lancaster ने तिच्या ट्विटर अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. त्याला कॅप्शन आहे की, 'या वैश्विक महामारीदरम्यान तुम्ही कोणत्या सूचनांबाबत बोलत आहात. माझ्या आईने तर तिच्या टेस्को डिलिव्हरीला आंघोळ घातली आहे'.

झालं असं की, एवीच्या आईने किराणा मालही सॅनिटाइज करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी बाथटबमध्ये तिने साबणाचं पाणी तयार केलं आणि त्यात सगळ्या पदार्थांसोबतच फ्लॉवरही टाकून दिलं. 

इतकेच नाही तर या महिलेने नोटा देखील सॅनिटाइज केल्या. नंतर त्या वाळवण्यासाठी इस्त्री देखील केल्या.

Web Title: Coronavirus : This women puts groceries in bathtub to sanitize them api