CoronaVirus News : कोरोनाला हलक्यात घेतलं अन् पॉझिटिव्ह मित्राला पार्टीला बोलवलं; आठवड्याभरात झाला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 19:22 IST2021-04-19T19:14:23+5:302021-04-19T19:22:21+5:30
CoronaVirus News & Latest Updates : या पार्टीत कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या लोकांना बोलविण्यात आले. यामुळे, कोरोना संसर्ग बर्याच लोकांमध्ये पसरला.

CoronaVirus News : कोरोनाला हलक्यात घेतलं अन् पॉझिटिव्ह मित्राला पार्टीला बोलवलं; आठवड्याभरात झाला मृत्यू
कोरोनाव्हायरस जगभरात विनाश आणत आहे. अशा परिस्थितीतही काही लोक कोरोनाला फक्त 'खोटं भय' म्हणून संबोधत आहेत. या लोकांना असा विश्वास आहे की कोरोनासारखा कोणताही विषाणू नाही. अशाच एका व्यक्तीचा नॉर्वेमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला, परंतु मरण्यापूर्वी त्याने अनेक लोकांचे जीव धोक्यात घातले.
नॉर्वेचा हंस ख्रिश्चन गार्डनर नावाचा एक माणूस कोरोनाविषयी सतत असत्या खोट्या आणि दिशाभूल करणार्या बातम्यांमुळे चर्चेत होता. कोरोना नसल्याचा दावा करत त्याने काही दिवसांपूर्वी आपल्या घरी दोन पार्टीज आयोजित केल्या होत्या. या पार्टीत कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या लोकांना बोलविण्यात आले. यामुळे, कोरोना संसर्ग बर्याच लोकांमध्ये पसरला.
Newsinenglish.no च्या रिपोर्टनुसार जसं पोलिसांना या घटनेबद्दल कळलं त्यावेळी एक पत्रक जारी करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी सांगितले की, या समारंभात किती लोकांनी सहभाग घेतला होता. याची आम्हाला कल्पना नाही. पण उपस्थित सर्वच लोकांच्या लवकरात लवकर चाचण्या केल्या जाणार आहेत.
एलन मस्कच्या गर्लफ्रेन्डने शेअर केला टॉपलेस फोटो, दाखवला पाठीवर काढलेला विचित्र टॅटू!
आठवड्याभरातच झाला मृत्यू
गार्डनरने कोरोना विषाणूच्या साथीसंदर्भात चुकीची माहिती विविध सोशल मीडिया वाहिन्यांद्वारे तसेच 2020 मधील अमेरिकेच्या निवडणुकीविषयी दिशाभूल करणार्या बातम्यांचा प्रसार केला. त्यांने 28, 29 मार्च रोजी पार्टीचे आयोजन केलं होतं आणि 6 एप्रिल रोजी कोरोनाचा गंभीर संसर्ग झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.