Video : जोड्या वरच बनतात! रस्त्याच्या कडेला कपल उभं अन् वरुन सुरू झाली मंगलाष्टकं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 17:19 IST2020-03-23T17:04:40+5:302020-03-23T17:19:53+5:30
आता सगळीकडे बंदी असल्याने या लग्नाला ना मित्र होते ना नातेवाईक. पण या जोडप्याने अनोख्या पद्धतीने लग्न केलं.

Video : जोड्या वरच बनतात! रस्त्याच्या कडेला कपल उभं अन् वरुन सुरू झाली मंगलाष्टकं!
अमेरिका हा कोरोनाचे सर्वात जास्त रूग्ण असलेला देश झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प सरकारने कोरोना रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंगसोबतच इतरही महत्वाचे पावले उचलली आहेत. सोशल डिस्टंसिंगमुळे लोक घराबाहेर निघू शकत नसल्याने एका जोडप्याने न्यूयॉर्कमध्ये रस्त्यावरच लग्न केलं. आता सगळीकडे बंदी असल्याने या लग्नाला ना मित्र होते ना नातेवाईक. पण या जोडप्याने अनोख्या पद्धतीने लग्न केलं.
वॉशिंग्टन हाइट्सच्या मॅनहॅटन परिसरातील एका छोट्या रस्त्यावर हे अनोखं लग्न पार पडलं. अनोखं यासाठी कारण जेव्हा हे जोडपं आयुष्यभर सोबत राहण्याच्या आणाभाका घेत होतं तेव्हा लग्नाचे रिवाज त्यांची मैत्रिण आणि मॅरेज ऑफिशिअल पूर्ण करत होते. हा सुंदर क्षण त्यांच्या एक मित्राने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.
हे कपल ऑक्टोबरमध्ये लग्न करणार होतं. पण त्यांनी विचार बदलाल आणि या संकटाच्या वेळीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांना चिंता होती की, कोरोना व्हायरसने पुढे संकट वाढू शकतं. त्यामुळे त्यांनी आताच लग्न केलं.