Corona Vaccine: मृत महिलेला टोचली कोरोनाची लस; २ महिन्यापूर्वी झाला होता मृत्यू, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 17:16 IST2021-09-09T17:04:03+5:302021-09-09T17:16:42+5:30
बलरामपूर – देशात एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे लसीकरण मोहिमेवर भर दिला जात आहे. जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरण सुरू झालं ...

Corona Vaccine: मृत महिलेला टोचली कोरोनाची लस; २ महिन्यापूर्वी झाला होता मृत्यू, नेमकं काय घडलं?
बलरामपूर – देशात एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे लसीकरण मोहिमेवर भर दिला जात आहे. जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरण सुरू झालं आहे. युद्धस्तरावर विक्रमी लसीकरण केले जात असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र या दाव्यावर आता प्रश्नचिन्ह उभं राहत आहे. लसीकरणाशी निगडीत अजब प्रकार यूपीच्या बलरामपूर येथून समोर येत आहे. ज्याठिकाणी दोन महिन्यापूर्वी मृत्यू झालेल्या महिलेला लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.
इतकचं नाही तर जेव्हा या महिलेचे अंतिम लसीकरण झाल्याचं प्रमाणपत्रही जारी करण्यात आले आहे. जेव्हा हे प्रकरण समोर आलं तेव्हा आरोग्य विभागाच्या टीम ही मानवी चूक असल्याचं सांगून हात वर केले. हा प्रकार बलरामपूर येथील उतरौला भागातील आहे. याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका टीमने हा कारनामा केला आहे. या केंद्रावर १४ एप्रिल २०२१ रोजी राजपती नावाच्या ८१ वर्षीय महिलेला कोरोना लसीचा पहिला डोस दे
प्रमाणपत्र सोशल मीडियावर व्हायरल
या प्रकरणाची भनक जेव्हा मृत महिलेच्या नातेवाईकांनी लागली तेव्हा त्यांनी लसीकरण प्रमाणपत्र डाऊनलोड करत सोशल मीडियावर टाकलं. महिलेच्या कुटुंबातील दीपक वर्मा यांनी हे लसीकरण प्रमाणपत्र शेअर केले. जे सध्या व्हायरल होत आहे. त्यानंतर एसीएमओ अरुण वर्मा यांच्या कानावर हा प्रकार पडला. तेव्हा ते मृत महिलेच्या घरी पोहचले आणि प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. एसीएमओला मृत महिलेचं लसीकरण झाल्याबाबात प्रश्न विचारला असता त्यांनी ही मानवी चूक असल्याचं सांगितले. वास्तविक या सेंटरवर मृत महिलेचे लसीकरण झालं होतं. तिथेच त्यांची नातेवाईक संवारी देवी यांना दुसरा डोस दिला. त्यादिवशी ऑपरेटरकडून चुकीने मृतकाचे आधारकार्ड टाकले त्यामुळे मृत महिलेच्या नावावर लसीकरण प्रमाणपत्र जारी करण्यात आले असं ते म्हणाले. तसेच या प्रकरणाची संपूर्ण सखोल चौकशी करण्यात येईल. सध्या हा एक प्रकार समोर आला आहे. परंतु आणखी काही असं घडलंय का? हे तपासून घेतलं जाईल. कुणी जाणुनबुजून हे काम केले नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितले.