Coke bottle full of urine : धक्कादायक! ऑनलाईन जेवण ऑर्डर केलं अन् कोल्डड्रिंकऐवजी बाटलीत भरून दिली लघवी, असा समोर आला प्रकार
By Manali.bagul | Updated: February 22, 2021 20:33 IST2021-02-22T20:30:54+5:302021-02-22T20:33:25+5:30
Viral Trending News in Marathi : ऑनलाईन जेवण ऑर्डर केल्यानंतर होणारे विचित्र आणि किळसवाणे प्रकार नेहमीच तुम्ही पाहिले असतील.

Coke bottle full of urine : धक्कादायक! ऑनलाईन जेवण ऑर्डर केलं अन् कोल्डड्रिंकऐवजी बाटलीत भरून दिली लघवी, असा समोर आला प्रकार
ऑनलाईन जेवणं मागवणं सध्याचा ट्रेंड बनला आहे. लोकांना भूक लागताच बटणं आपोआप मोबाईलवर जातात आणि लोक जेवण ऑर्डर करतात. त्यानंतर आपलं काम करत जेवण येण्याची वाट पाहतात. ऑनलाईन जेवण ऑर्डर केल्यानंतर होणारे विचित्र आणि किळसवाणे प्रकार नेहमीच तुम्ही पाहिले असतील. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर येत आहे. एका माणसानं जेवण ऑर्डर करताना जेवणासोबत कोल्डड्रिंकसुद्धा मागवले होते. तुमचा विश्वास बसणार नाही पण कोल्डड्रिंकऐवजी या बाटलीत मुत्र भरून आणले होते.
काय आहे संपूर्ण प्रकार?
Oliver McManus नं ट्विट करत याबाबत अधिक माहिती दिली आहे. तो इंग्लंडचा रहिवासी असून त्यानं दिलेल्या माहितीनुसार hoisin beef आणि yoghurt spiced chicken सह कोकची बॉटल दिली. ही बॉटल पूर्णपणे मुत्रानं भरलेली होती. त्यांनी या बॉटलचा फोटोसुद्धा सोशल मीडियावर शेअर केला आहे. @HelloFreshUK ला टॅग करत त्यांनी याबबत अधिक माहिती दिली आहे.हाय हिल्स घालून ती धाव धाव धावली; कधीही पाहिला नसेल असा स्टंट, व्हिडीओ झाला तुफान व्हायरल
मेट्रोनं दिलेल्या माहितीनुसार ओलिव्हर यांनी सांगितले की, '' जेव्हा आम्हाला ही बॉटल मिळाली तेव्हा झाकण बंद होतं आणि अन्नसुद्धा पॅक होते.'' @HelloFreshUK नं यावर आपली प्रतिक्रिया देत माफी मागितली आहे. इतकंच नाही तर कंपनीकडून आश्वासनही देण्यात आलं आहे. त्यांनी सांगितले की,''आम्ही तपासणी करत आहोत, ज्यानी हे कृत्य केले आहे. त्यांच्यावर कारवाई केली जाईल.'' चपात्यांना थुंकी लावून लोकांना वाढायचा; समोर आला किळसवाणा प्रकार, व्हायरल होताच चोप चोप चोपलं