कुत्र्याने अतिशय सावधपणे जेवणं चोरलं अन् मालकाला लावली शेंडी; पाहा भन्नाट व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2020 13:35 IST2020-11-19T13:33:19+5:302020-11-19T13:35:10+5:30
Viral News in Marathi : तुम्ही अनेकदा व्हिडीओमध्ये पाहिलं असेल जेवण चोरण्याच्या प्रयत्नात कुत्रा पकडला जातो. असाच काहीसा प्रकार घडला आहे.

कुत्र्याने अतिशय सावधपणे जेवणं चोरलं अन् मालकाला लावली शेंडी; पाहा भन्नाट व्हिडीओ
सध्या सोशल मीडियावर एका चतूर कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. या व्हिडीओत कुत्रा डोकं लावून मालकाला वेडं बनवतो. तुम्ही अनेकदा व्हिडीओमध्ये पाहिलं असेल जेवण चोरण्याच्या प्रयत्नात कुत्रा पकडला जातो. असाच काहीसा प्रकार घडला आहे. पण यावेळी कुत्रा पकडला गेलेला नाही. सोशल मीडियावर लोकांनी या व्हिडीओला खूप पसंती दिली आहे.
Dogs. pic.twitter.com/ai5N6uc4g3
— Helena Morrissey DBE (@MorrisseyHelena) November 13, 2020
या व्हिडीओमधील कुत्र्याच्या मालकाने कुत्र्यासमोर जेवण ठेवले होते. त्यानंतर काहीवेळ वाट पाहायला लावली. मालक काहीवेळासाठी दूर गेल्यानंतर खण उघडून पुन्हा कुत्र्याने खाण्याचा प्रयत्न केला. मालकाला वाटलं की त्यांचा कुत्रा इमानदार आहे. पण कॅमेरात या कुत्र्याचा हा प्रकार कैद झाला आहे. हा व्हिडीओ सगळ्यात आधी टिकटॉकवर शेअर करण्यात आला होता. हा व्हिडीओ ब्रिटीश फायनेंसर हेलेना मॉरिससे यांच्याकडून ट्विटरवर परत पोस्ट करण्यात आला आहे. ऊसाच्या शेतात शिरलं हत्तीचं पिल्लू; अन् कोणीतरी आल्याचे कळताच खांबाआड लपलं, पाहा फोटो
मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर जवळपास ३.९ लाख वेळा हा व्हिडीओ पाहण्यात आला आहे. लोकांनी या कुत्र्याचे कौतुक केले आहे. कुत्र्याला असा स्टंट करण्यासाठी प्रक्षिक्षण दिलं असावं असा अनेकांचा अंदाज आहे. २९ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. तर ९९ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. स्वच्छता कर्मचाऱ्याला मिळाली दिवाळीची मिठाई; डबा उघडून पाहिल्यावर मोठा धक्काच बसला