स्वच्छता कर्मचाऱ्याला मिळाली दिवाळीची मिठाई; डबा उघडून पाहिल्यावर मोठा धक्काच बसला

By प्रविण मरगळे | Published: November 19, 2020 09:48 AM2020-11-19T09:48:10+5:302020-11-19T09:48:37+5:30

लोकांमध्ये अजूनही प्रामाणिकपणा आहे हे रोशनीने सिद्ध केलं, यामुळे माझा विश्वास आणखी दृढ झाला आहे.

Sweeper worker gets Diwali sweets; When opened the box, she was shocked found 10 lakh in Delhi | स्वच्छता कर्मचाऱ्याला मिळाली दिवाळीची मिठाई; डबा उघडून पाहिल्यावर मोठा धक्काच बसला

स्वच्छता कर्मचाऱ्याला मिळाली दिवाळीची मिठाई; डबा उघडून पाहिल्यावर मोठा धक्काच बसला

Next

नवी दिल्ली – मिठाईच्या डब्यात मिळालेले १० लाख रुपये पुन्हा परत करुन स्वच्छता कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणाचं उदाहरण समोर ठेवलं आहे. पूर्व दिल्लीचे महापालिकेच्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्याचा सत्कार महापौर निर्मल जैन यांच्याकडून करण्यात येणार आहे.

कांती नगर प्रभागात महानगरपालिकेच्या महिला स्वच्छता कर्मचार्‍याने प्रामाणिकपणाचे उदाहरण मांडले आहे. सकाळी रोशनी नावाच्या या कर्मचाऱ्याला एका ज्येष्ठ नागरिकाने मिठाईच्या डब्याऐवजी पैशाने भरलेले थैली दिली. जेव्हा ती महिला घरी परत आली तेव्हा तिने थैली उघडली. त्यात दहा लाख रुपये होते. या महिला कर्मचाऱ्याने तातडीने स्वच्छता अधीक्षकांना याची माहिती दिली. यानंतर दोघंही नगरसेवक कांचन माहेश्वरी यांच्या कार्यालयात पोहोचले. याठिकाणी त्या ज्येष्ठ नागरिकाला बोलवण्यात आले, पण त्यांचे दहा लाख रुपये परत केले. पैसे मिळाल्यानंतर ज्येष्ठ नागरिक सोनू नंदा खूप आनंद झाले आणि रोशनीला त्यांच्या वतीने २१०० रुपयांचे बक्षीस दिले.

नगरसेवक कांचन माहेश्वरी म्हणाले की, रोशनी यांनी आपल्या प्रभागासह महानगरपालिकेचे नावही उंचावले आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना नेहमीच संशयाच्या नजरेने पाहतात. परंतु, रोशनी यांनी हे सिद्ध केले की प्रामाणिक लोक पूर्व दिल्ली महापालिकेत काम करतात. मिळालेल्या माहितीनुसार, रोशनी पूर्व महापालिकेत कायमस्वरूपी कर्मचारी आहेत. मंगळवारी सकाळी ती शंकर नगर विस्ताराची लेन नंबर सहा येथे झाडूने स्वच्छता करत होती. दरम्यान, जवळच राहणार्‍या सोनू नंदाने त्यांना एक मिठाईचा बॉक्स असलेली थैली दिली, यात दिवाळी मिठाई आहे असं त्यांनी रोशनीला सांगितले. रोशनीनेही ती थैली स्वत:जवळ ठेवली, घरी पोहोचल्यावर तिने थैली उघडली आणि नोटांचा बंडल पाहून तिला धक्का बसला, त्यानंतर तिने तातडीने स्वच्छता अधीक्षक जितेंद्र यांना माहिती दिली.

यानंतर हे दोन्ही नगरसेवक कांती नगर येथील कांचन माहेश्वरी यांच्या कार्यालयात पोहोचले. दुसरीकडे सोनू नंदाने सांगितले की, त्यांनी थैली रोशनी यांना मिठाई म्हणून दिली होती. जेव्हा त्यांचा मुलगा थैली शोधू लागला तेव्हा त्यात दहा लाख रुपये असल्याचे समजले. रोशनी तिथे दिसत नसल्याने सोनू नंदा अस्वस्थ झाले. दरम्यान, त्यांना नगरसेवक कार्यालयातून फोन आला. यानंतर तो आपल्या मुलासह ते कार्यालयात पोहोचले. पैसे परत मिळाल्याने त्यांना प्रचंड आनंद झाला.

सोनू नंदा म्हणाले की, लोकांमध्ये अजूनही प्रामाणिकपणा आहे हे रोशनीने सिद्ध केलं, यामुळे माझा विश्वास आणखी दृढ झाला आहे. तर जरी माझ्या कुटुंबात काही समस्या आहे. पण मी हे पैसे ठेवू असा क्षणभरही विचार केला नाही. कदाचित या पैशाची गरज त्या ज्येष्ठ नागरिकाला जास्त गरज आहे. म्हणून मी परत करण्याचे ठरवलं असं रोशनीने सांगितले.

Read in English

Web Title: Sweeper worker gets Diwali sweets; When opened the box, she was shocked found 10 lakh in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.