VIDEO : पर्यटकांना दाखवण्यासाठी गाढवाला बनवलं झेब्रा, प्राणी संग्रहालयाचा अजब कारनामा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 14:31 IST2025-02-19T14:25:55+5:302025-02-19T14:31:59+5:30
चीनमधील या प्राणी संग्रहालयानं हे मान्य केलं की, झेब्रा नव्हता म्हणून त्यांनी गाढवाला त्यासारखा रंग दिला आणि झेब्रा म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला.

VIDEO : पर्यटकांना दाखवण्यासाठी गाढवाला बनवलं झेब्रा, प्राणी संग्रहालयाचा अजब कारनामा!
Chinese Zoo Paints Donkey: सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्राणी संग्रहालयातील वेगवेगळे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. हा व्हिडीओ बघून लोक पोटधरून हसत सुटले आहेत. कारण यात जे दिसतं ते आहेच कमाल. हा व्हिडीओ चीनच्या शेडोंग प्रांतातील झिबो सिटी मनोरंजन पार्कमधील आहे. येथील प्राणी संग्रहालयात एका गाढवाला झेब्रा बनवण्यासाठी त्याला काळा आणि पांढरा रंग दिला गेला.
गाढवाला बनवलं झेब्रा
न्यूयॉर्क पोस्टच्या एका रिपोर्टनुसार, हा जुगाड करण्याचं कारण पर्यटकांना अधिक आकर्षित करणं हा होता. मात्र, सोशल मीडियातून यावर टिका होत आहे. चीनमधील या प्राणी संग्रहालयानं हे मान्य केलं की, झेब्रा नव्हता म्हणून त्यांनी गाढवाला त्यासारखा रंग दिला आणि झेब्रा म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला. आता झू च्या या कारनाम्याची लोक खिल्ली उडवत आहेत. तर झू ने सांगितलं की, ही त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी होती. व्हिडीओ व्हायरल्यावर झू नं हे मान्य केलं की, त्यांनी गाढवाला रंग दिला. सोबतच हाही दावा केला की, हा रंग नुकसानकारक नव्हता.
🤡 Le zoo de Zibo en Chine a maquillé des ânes en leur peignant des rayures pour les faire passer pour des zèbres.
— 75 Secondes 🗞️ (@75secondes) February 16, 2025
🗞️ https://t.co/RGrf2HMWvCpic.twitter.com/chybzgYOd8
प्राणी संग्रहालयातील एक कर्मचाऱ्यानं स्पष्टीकरणं दिलं की, "मालकानं हे सगळं एक गंमत म्हणून केलं. याआधी एका प्राणी संग्रहालयात कुत्र्याला पांडा म्हणून दाखवण्यात आलं होतं". लोक या घटनेचा निषेध करत आहेत. एका यूजरनं लिहिलं की, "हा प्राण्यांसोबत आणि पर्यटकांसोबत अन्याय आहे". तर दुसऱ्यानं लिहिलं की, "असं नेहमी चीनमध्येच का होतं?".
आधीही घडल्या अशा घटना
ही अशी पहिलीच घटना नाही की, ज्यात चीनमधील एखाद्या प्राणी संग्रहालयात असा प्रकार घडला. गेल्या महिन्यात जिआंगसु प्रांतातील एका प्राणी संग्रहालयात दोन कुत्र्यांना वाघासारखं रंगवण्यात आलं होतं. प्राणी संग्रहालयानं असाही दावा केला होता की, त्यांचे वाघ खूप मोठे आणि खतरनाक आहेत. मात्र, या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर समोर आलं की, ते खरे वाघ नव्हते. तर वाघासारखे रंगवलेले 'चाउ चाउ' प्रजातीचे कुत्रे होते.