प्यारवाली लव्हस्टोरी! किडनी फेल झाल्यानं कॅन्सर रूग्णासोबत केलं लग्न, कहाणी वाचून व्हाल भावूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 16:40 IST2025-10-29T16:40:16+5:302025-10-29T16:40:56+5:30
Viral News : वांगने कॅन्सर पेशंट्सच्या सपोर्ट ग्रुपमध्ये एक भावनिक पोस्ट लिहिली की, 'मी लग्नानंतर तुझी खूप काळजी घेईन. मला माफ कर, पण मला फक्त जगायचं आहे'.

प्यारवाली लव्हस्टोरी! किडनी फेल झाल्यानं कॅन्सर रूग्णासोबत केलं लग्न, कहाणी वाचून व्हाल भावूक
China Cancer Love Story: चीनच्या शांक्सी प्रांतातील ही घटना एखाद्या सिनेमाच्या कथानकाला शोभेल अशीच आहे. 24 वर्षांच्या वांग शियाओला जेव्हा डॉक्टरांकडून समजलं की, तिच्या किडनी निकामी झाल्या आहेत आणि ट्रान्सप्लांटशिवाय ती फक्त एका वर्षापर्यंतच जिवंत राहू शकते, तेव्हा तिने आयुष्याशी एक अनोखा करार केला. अशा पुरुषाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला, जो मृत्यूच्या उंबरठ्यावर आहे आणि ज्याची किडनी तिला मिळू शकेल.
वांगने कॅन्सर पेशंट्सच्या सपोर्ट ग्रुपमध्ये एक भावनिक पोस्ट लिहिली की, 'मी लग्नानंतर तुझी खूप काळजी घेईन. मला माफ कर, पण मला फक्त जगायचं आहे'. ही पोस्ट वाचल्यानंतर 27 वर्षांचे यू झेनपिंग यांनी रिप्लाय दिला. ते स्वतःही कॅन्सरशी झुंज देत होते आणि त्यांचा ब्लड ग्रुप वांगशी जुळत होता. दोघांनी 2013 मध्ये साधेपणाने लग्नाची नोंदणी केली. करार असा होता की वांग यूची काळजी घेईल जोपर्यंत तो जिवंत आहे आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याची किडनी तिला मिळेल. पण पुढे हा करार प्रेमात बदलला.
करारातून जन्मलेलं खरं प्रेम
काही दिवसांमध्येच वांग आणि यू यांच्यात भावनिक नातं तयार झालं. वांगने यूच्या उपचारांसाठी मदत केली, हाताने बुके तयार करून विकले आणि त्यातून मिळालेल्या पैशांनी त्याच्यावर उपचार करण्याचा खर्च चालवला. हळूहळू दोघांमधील कराराची जागा प्रेमाने घेतली. यूची तब्येत सुधारली, आणि वांगची डायलिसिसची गरजही कमी झाली.
2014 मध्ये यूची तब्येत स्थिर झाल्यावर त्याने वांगला सांगितलं, 'आता हा फक्त एक करार नाही, हे प्रेम आहे'. दोघांनी मिळून आयुष्य नव्यानं सुरू केलं. जिथे मृत्यूच्या छायेतून नव्या आशेची किरणे फुलली.
आज वांग आणि यूची ही कथा सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आली आहे. लोक याला प्रेम, त्याग आणि मानवतेचा सर्वात सुंदर संगम म्हणत आहेत. या जोडप्याने दाखवून दिलं की कधी कधी आयुष्याचा सर्वात मोठा करार, मनाचा सर्वात पवित्र संबंध बनतो.