बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 19:13 IST2025-11-14T19:12:54+5:302025-11-14T19:13:58+5:30
पत्नीला महागड्या गोष्टींची आवड असल्याने त्याचे सर्व पैसे संपले आणि आता आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी त्याला डिलिव्हरी ड्रायव्हर म्हणून काम करावं लागत आहे.

AI फोटो
चीनमधील एक व्यक्ती त्याच्या पत्नीमुळे कंगाल झाला आहे. पत्नीला महागड्या गोष्टींची आवड असल्याने त्याचे सर्व पैसे संपले आणि आता आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी त्याला डिलिव्हरी ड्रायव्हर म्हणून काम करावं लागतं. साउथ चायना मॉर्निंग पोस्टमधील एका रिपोर्टनुसार, चीनमधील पत्नीने पतीचे पैसे वापरून कॉस्मेटिक सर्जरी, लक्झरी हँडबॅग्ज, लोशन आणि महागड्या फेस क्रिम्सवर खूप खर्च केला. धक्कादायक बाब म्हणजे आता पती कंगाल झाल्यावर त्याची पत्नी त्याला सोडून गेली.
चीनच्या प्रतिष्ठित झेजियांग विद्यापीठातून डिग्री घेतलेल्या एका व्यक्तीने आपलं सर्व सेव्हिंग पत्नीवर खर्च केली. यामुळे त्याची चांगल्या पगाराची नोकरी देखील गेली. या ४३ वर्षीय पुरूषाचं नाव कियानकियान आहे. सध्या त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. तो हांग्जो येथील एका सरकारी कार्यालयात कर्मचारी म्हणून काम करायचा. त्याचं मासिक उत्पन्न ५०,००० युआन होतं.
पाच वर्षांपूर्वी कियानकियानने काही कारणास्तव त्याची नोकरी गमावली आणि तेव्हापासून तो डिलिव्हरी ड्रायव्हर म्हणून काम करत आहे, दरमहा १०,००० युआन पेक्षा कमी कमाई करत आहे. यामुळे त्याची पत्नी त्याला सोडून गेली. मी तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करत होतो. माझ्या पत्नीचं माझ्यावर प्रेम नव्हतं. तिचं फक्त माझ्या पैशावर प्रेम होतं असं त्याने म्हटलं आहे.
कियानकियानच्या पत्नीला सुंदर दिसायची फार आवड होती. ती तिच्या हातांना आणि पायांना महागड्या क्रीम लावायची आणि तिची फिगर मेंटेन राहण्यासाठी महागडी औषधं घ्यायची. तिने अनेक कॉस्मेटिक सर्जरीही केल्या. तिच्या अवाजवी खर्चासाठी कियानकियान त्याचा फ्लॅट देखील विकावा लागला. जेव्हा त्याच्याकडे पैसे शिल्लक राहिले नाहीत तेव्हा पत्नी त्याला सोडून गेली. या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.