कॉकपिटमध्ये फोटो काढून महिला जोमात अन् तिकडे पायलट 'कोमात'...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 14:50 IST2019-11-07T14:48:25+5:302019-11-07T14:50:16+5:30
हा फोटो तिने नंतर सोशल मीडियावर शेअरही केला. हा फोटो व्हायरल झाला आणि या घटनेचा खुलासा झाला.

कॉकपिटमध्ये फोटो काढून महिला जोमात अन् तिकडे पायलट 'कोमात'...
चीनचा एक पायलट एका महिला प्रवाशावर जरा जास्तच मेहरबान झाला. झालं असं की, पायलट एका महिला प्रवाशाला कॉकपिटमध्ये सोबत घेऊन बसला. यानंतर महिलेने कॉकपिटमध्ये नाश्ता केला आणि नाश्ता करतानाचा फोटोही काढला. हा फोटो तिने नंतर सोशल मीडियावर शेअरही केला. हा फोटो व्हायरल झाला आणि या घटनेचा खुलासा झाला. त्यानंतर या विमानाच्या पायलटला सस्पेन्ड करण्यात आलंय.
चीनमध्ये त्यांचा वेगळा सोशल मीडिया आहे. या वेइबो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महिला ब्लॉगरने फोटो पोस्ट केला होता. यात महिला विमानाच्या कॉकपिटमध्ये बसलेली दिसते आहे. तिच्या समोर नाश्ताही ठेवलेला दिसत आहे. महिलेने याला 'थॅंक्स टू द कॅप्टन, सो हॅप्पी' असं कॅप्शन दिलं होतं.
कदाचित पायलटनेच क्लिक केला होता फोटो
ही घटना आहे येंगझोऊ शहरातील. असे सांगितले जात आहे की, विमान एअर गुलिनचं होतं. ४ जानेवारीची ही घटना होती. तेव्हा कदाचित पायलटनेच हा फोटो काढला होता. आता एअरलाइन्सने कारवाई करत पायलटला सस्पेन्ड केलंय आणि त्याला आता विमान उडवता येणार नाहीये.