VIDEO: सेल्फीच्या नादात दोरी सोडली अन्... मित्रांसमोरच गिर्यारोहक ५५८८ मीटर उंच शिखरावरुन पडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 13:03 IST2025-10-07T12:49:17+5:302025-10-07T13:03:44+5:30
चीनमध्ये एका गिर्यारोहकाचा उंच डोंगरावरुन पडून दुर्दैवी मृत्यू झाला.

VIDEO: सेल्फीच्या नादात दोरी सोडली अन्... मित्रांसमोरच गिर्यारोहक ५५८८ मीटर उंच शिखरावरुन पडला
China Climber Death: सोशल मीडियावर सेल्फी काढण्याचा ट्रेंड आल्यापासून अनेकांचा यामुळे जीव गेला आहे. चुकीच्या वेळी आणि चुकीच्या ठिकाणी काढलेले सेल्फी हे या मृत्यूंसाठी कारणीभूत ठरले आहेत. परफेक्ट फोटो काढण्याच्या धडपडीत लोक रेल्वे रुळांपासून ते उंच कड्यांपर्यंतच्या धोकादायक ठिकाणी सेल्फी घ्यायला मागेपुढे पाहत नाहीत. मात्र याच सेल्फीने आणखी एकाचा जीव घेतला. चीनमध्ये एका गिर्यारोहकाने फोटो काढण्याच्या नादात आपला जीव गमावला.५५८८ मीटर उंच शिखरावरुन गिर्यारोहक कोसळतानाचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चीनच्या सिचुआन प्रांतातील माउंट नामा वरती फोटो काढण्याच्या नादात ३१ गिर्यारोहकाचा मृत्यू झाला. माध्यमांच्या वृत्तानुसार, हाँग नावाच्या गिर्यारोहकाने फोटो काढण्यासाठी सुरक्षा दोरखंड सोडला होता. तितक्यात त्याचा तोल गेला आणि तो दरीत घसरत गेला. २५ सप्टेंबर रोजी सिचुआनमधील नामा शिखरावर चढताना ही दुर्दैवी घटना घडली. व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये तो डोंगराच्या कडेला पडताना दिसत आहे.
चिनी माध्यमांनुसार, हाँग नावाच्या गिर्यारोहकाने फोटो काढण्यासाठी त्याची सेफ्टी दोरी सोडला होता. उभे राहण्याचा प्रयत्न करत असताना, तो त्याच्या क्रॅम्पन्सवरून घसरला आणि खाली पडला. हाँग पहिल्यांदाच इतक्या उंच ठिकाणी गिर्यारोहण करत होता. मात्र एका चुकीमुळे तो डोंगरावरुन १०० ते २०० मीटर खाली पडला, अशी माहिती त्याच्या नातेवाईंकांनी दिली.
व्हायरल व्हिडीओमध्ये हाँग डोंगराच्या कड्यावरून पडताना दिसत आहे. दोरी सोडल्यानंतर हाँगचा तोल गेला आणि तो खाली पडला होता. तो उठण्याचा प्रयत्न करताना तो अडखळला आणि पुन्हा बर्फात घरंगळत थेट दरीत कोसळला. यावेळी एका गिर्यारोहकाच्या कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला. हाँग खाली जात असताना कोणीही पुढे आलं नाही कारण त्याला वाचवण्याच्या नादात दुसऱ्यांना जीव गमवावा लागला असता. हाँग मृत्यूच्या जवळ जात असताना इतरजण स्तब्ध उभे होते. नामा शिखर हा ५,५८८ मीटर उंच पर्वत आहे आणि तो माउंट गोंगाच्या बाजूच्या शिखरांपैकी एक आहे.
🚨 BREAKING: Tragedy strikes on Nama Peak, Sichuan!
— Dreams N Science (@dreamsNscience) September 28, 2025
On Sept 27, 2025, a 31-year-old hiker plummeted 200 meters to his death after unclipping his safety rope for a fatal selfie near a crevasse.
The heart-stopping fall on the icy 5,588-meter sub-peak of Mount Gongga was caught in… pic.twitter.com/CY49zTRQ44
माउंट एव्हरेस्ट कॅम्पमध्ये १,००० गिर्यारोहक अडकले
दरम्यान, माउंट एव्हरेस्टच्या तिबेटी बाजूच्या पूर्वेकडील उतारावरील कॅम्पमध्ये सुमारे १,००० गिर्यारोहक अडकले आहेत. हिमवादळामुळे माउंट एव्हरेस्टच्या कॅम्पमध्ये अडकलेल्या रविवारी बचाव कार्य सुरू करण्यात आले. ४,९०० मीटरपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या या प्रदेशातील बर्फवृष्टीमुळे रस्ते बंद झाले आहेत आणि शेकडो स्थानिक ग्रामस्थ आणि बचाव पथके त्यांना वाचवण्यासाठी तैनात करण्यात आली आहेत.