रीलचा नाद लय बेक्कार! व्ह्यूजसाठी मुलाच्या अंगावर सोडला साप; थरकाप उडवणारा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 11:12 IST2025-03-17T11:12:02+5:302025-03-17T11:12:48+5:30
लहान मुलाला एका खुर्चीवर बसवलं आणि त्याच्या अंगावर साप सोडला.

रीलचा नाद लय बेक्कार! व्ह्यूजसाठी मुलाच्या अंगावर सोडला साप; थरकाप उडवणारा Video
साप विषारी असो वा नसो तो पाहिल्यावर अनेकांची घाबरगुंडी उडते. फक्त एका रील आणि काही व्ह्यूजसाठी एका युजरने धक्कादायक कृत्य केलं आहे. लहान मुलाला एका खुर्चीवर बसवलं आणि त्याच्या अंगावर साप सोडला. सोशल मीडियावर हा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल होत असून यावरून बरीच चर्चा रंगली आहे.
इंटरनेटवर या व्हिडीओमुळे वाद निर्माण झाला आहे. युजर्स या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत आणि मुलाच्या अंगावर साप सोडणं हे चुकीचं असल्याचं म्हणत आहेत. मुलगा सापाला स्वत:पासून दूर करतो. तो अजिबात सापाला घाबरत नाहीय इन्स्टाग्रामवर विवेक चौधरी नावाच्या स्नेक स्पेशॅलिस्टने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक चिमुकला सापासोबत खेळताना दिसत आहे. सर्वप्रथम साप मुलाच्या गळ्यात असतो. नंतर मुलगा तो काढतो त्याला हाताने पकडतो. थोड्यावेळाने तो स्वत:च सापाला त्याच्यापासून दूर करतो.
२९ सेकंदांचा हा छोटासा व्हिडीओ पाहून युजर्सनी 'व्ह्यूजसाठी मुलाचा जीव धोक्यात घालू नये' असं म्हटलं आहे. @vivek_choudhary_snake_saver ने हे रील इन्स्टाग्रामवर पोस्ट करत रितेश चौधरीचा आणखी एक धमाका असं म्हटलं आहे. या व्हिडीओला १ कोटी २९ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर पोस्टला १ लाखाहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.