Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 18:00 IST2025-09-13T17:58:59+5:302025-09-13T18:00:16+5:30
Man Bear cold drinks Trending Video: जंगलात त्या तरुणाने अस्वलाच्या समोर जाऊ बाटली ठेवली.

Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
Man Bear Trending Video: सोशल मीडिया हा एक असा प्रकार आहे, जिथे काहीही गोष्टी व्हायरल होतात. कधीतरी एखादा उत्तम व्हिडीओ व्हायरल होतो, तर कधीतरी एखादं गाणं लोकप्रिय होऊन जाते. तसेच सोशल मीडियावर विविध प्राणी, पक्ष्यांचेही व्हिडीओ व्हायरल होतात. हल्ली रील बनवण्याच्या नादात लोक प्राण्यांसोबत विचित्र असे व्हिडीओ शूट करतात आणि त्यामुळे ते टीकेचे धनी ठरतात. अनेकदा अशा व्हिडीओमुळे वाद निर्माण होतो. तर काही वेळा प्राण्यांच्या आरोग्याशीही खेळ होतो. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
व्हिडीओमध्ये नेमके काय?
एका तरुणाने रील बनवण्यासाठी अस्वलाला थंड पेय दिले. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना जितकी मजेदार दिसते, तितकीच ती प्रत्यक्षात मात्र धोकादायक आहे. व्हिडिओ कधी शूट करण्यात आला, याची अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. पण तो व्हिडीओ छत्तीसगडचा असल्याचे बोललो जात आहे. पाहा व्हिडीओ-
रील के चक्कर में भालू को पिला दी कोल्ड ड्रिंक,
— Khushbu_journo (@Khushi75758998) September 12, 2025
कांकेर में युवक का भालू को कोल्ड ड्रिंक पिलाने का वीडियो वायरल हुआ है। यह हरकत युवक के जान को खतरे में डालने के साथ ही भालू के स्वास्थ्य के साथ भी खिलवाड़ है...#chhattisgarh#kanker#animals#colddrink#Bearspic.twitter.com/AajmaPQOSn
व्हिडीओ व्हायरल होताच मुलगा अडचणीत
हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर @Khushi75758998 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. पोस्टमध्ये असे म्हटले आहे की त्या तरुणाने आपला जीव धोक्यात घातलाच, पण त्यासोबतच वन्य प्राण्याला इजा करण्याचाही प्रयत्न केला. व्हिडीओ व्हायरल होताच वनविभाग 'अँक्शन मोड'मध्ये आला. अस्वलाला थंड पेय देणे हे अत्यंत बेजबाबदार कृत्य आहे, असे विभागाने म्हटले आहे. तसेच, कायदा मोडणाऱ्यांनाही सोडले जाणार नाही असा स्पष्ट इशारा विभागाने दिला.