Video : ही कसली विचित्र प्रथा! झोपलेल्या स्त्रियांच्या पाठीवर चालून साधू देताहेत मूल होण्याचा आशीर्वाद

By manali.bagul | Published: November 24, 2020 06:01 PM2020-11-24T18:01:32+5:302020-11-24T18:13:29+5:30

Viral News in Marathi : मूल होण्यासाठी असा प्रकार केलेला तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 

Chhattisgarh childless women let priests walk on them in hope of a baby | Video : ही कसली विचित्र प्रथा! झोपलेल्या स्त्रियांच्या पाठीवर चालून साधू देताहेत मूल होण्याचा आशीर्वाद

Video : ही कसली विचित्र प्रथा! झोपलेल्या स्त्रियांच्या पाठीवर चालून साधू देताहेत मूल होण्याचा आशीर्वाद

Next

अनेकांना मूल न होण्याची समस्या असते. त्यासाठी डॉक्टर, दवाखाना या व्यतिरिक्त इतर अनेक  मार्गांचा वापर केला जातो. मूल व्हावं म्हणून नवस, दुवा, पूजा-पाठ, व्रत भारतात अनेक ठिकाणी केलं जातं. सध्या सोशल मीडियावर एका प्रथेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मूल होण्यासाठी असा प्रकार केलेला तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 

छत्तीसगढच्या धमतरी जिल्ह्यातील एक विचित्र परंपरा सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. धमतरी इथे दरवर्षी एक जत्रा भरते. या जत्रेच्यावेळी शेकडो विवाहीत महिला रस्त्यावर उलट्या  झोपतात. त्यानंतर साधू हातात पताका घेऊन या महिलांच्या पाठीवरून चालातात. पुजाऱ्यांचा किंवा साधूंचा हा तथाकथित आशीर्वाद बायकांना मूल होण्यासाठी फायदेशीर ठरतं अशी  धारणा इथल्या स्थानिकांची आहे. 

न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार या  जिल्ह्यातील माढाई मेळा (Madhai Fair) या जत्रेत दरवर्षी हा प्रकार होतो. साधारणपणे दिवाळीनंतर पहिल्या शुक्रवारी हा मेळा आयोजित केला जातो आणि हजारो भाविक एकत्र येऊन अंगारमोती देवीची पूजा करतात. गेल्या ५०० वर्षांपासून ही प्रथा सुरू असल्याचेही समोर आले आहे. या प्रथेमुळे अनेक महिला या गर्भवती झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये तुम्ही पाहू  शकता जवळपास २०० महिला हात जोडून जमिनीवर पालथ्या (पोटावर) झोपलेल्या दिसतात. मंत्रोच्चार करत आणि हाती पताका हातात घेऊन दोन साधू त्यांच्या पाठीवरून चालताना दिसत आहेत. हृदयद्रावक! आधी आई, बाबा आणि मग भाऊ; अवघ्या ५ दिवसात कोरोना योद्ध्याचं कुटूंब होत्याचं नव्हतं झालं

छत्तीसगढ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा किरणमयी नायक यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, "मी अशा प्रथाचं समर्थनही करत नाहीत. या परंपरा  घातक आहेत. अशा विचित्र  प्रकारांमुळे महिलांच्या पाठीला कायमस्वरूपी इजा होऊ शकते. गावकऱ्यांना, विशेषत: महिलांना अशा प्रथांमुळे उद्भवणाऱ्या धोक्यांविषयी जागृत करण्यासाठी मी त्या गावाला नक्कीच  भेट देणार आहे." विशेष म्हणजे या कार्यक्रमाला  शेकडो लोक उपस्थित होतो. पण कोणाच्याही तोंडाला मास्क लावलेला दिसत नव्हता. तसंच सोशल डिस्टेंसिंगचाही फज्जा उडाला होता.  रिअल हिरो! रुग्णालयाला लागली आग; अन् गर्भवती कुत्रीने जीवाशी खेळत वाचवले लोकांचे प्राण, पाहा फोटो

Web Title: Chhattisgarh childless women let priests walk on them in hope of a baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.