लगेचच तपासा! तुमच्या नोटांवर किंवा नाण्यांवर हा नंबर असेल तर...; लाखो रुपये कमवू शकता
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 14:34 IST2025-03-24T14:34:44+5:302025-03-24T14:34:54+5:30
,५,१० ते ५००,२००० रुपयांच्या नोटांवर हा नंबर असेल तर त्या लाखो रुपयांची किंमत मोजून विकल्या जात आहेत.

लगेचच तपासा! तुमच्या नोटांवर किंवा नाण्यांवर हा नंबर असेल तर...; लाखो रुपये कमवू शकता
जर तुमच्याकडे जुन्या नोटा किंवा नाणी असतील तर तुम्ही लखपती बनू शकता. विविध नंबरची सिरीज किंवा खास नंबर असेल तर त्याला जास्त मागणी आहे. यापैकीच एक नंबर आहे, तो म्हणजे ७८६. हा तो नंबर आहे, जो इस्लाममध्ये शुभ मानला जातो. १,५,१० ते ५००,२००० रुपयांच्या नोटांवर हा नंबर असेल तर त्या लाखो रुपयांची किंमत मोजून विकल्या जात आहेत.
ओएलएक्स, क्विकर आणि ई बे सारख्या वेबसाईटवर या नोटा खरेदी केल्या जातात. यासाठी बोली लावली जाते. जर तुमच्याकडे अशी नोट किंवा नाणे असेल तर ते विकणे खूप सोपे आहे. ऑनलाइन विक्री प्लॅटफॉर्मवर विक्रेता म्हणून नोंदणी केल्यानंतर तुम्ही या नोटेचा किंवा नाण्याचा फोटो अपलोड करू शकता. यानंतर तुमची जाहिरात खरेदीदारांना दिसेल. ज्यांना ते खरेदी करायचे आहे ते वेबसाइटद्वारे तुमच्याशी संपर्क साधतील.
इस्लाममध्ये ७८६ हा आकडा खूप खास मानला जातो. कुराणच्या सुरुवातीच्या वाक्य "बिस्मिल्लाह अल-रहमान अल-रहीम" चे हे संख्यात्मक मूल्य आहे. लोक ते शुभ मानतात आणि त्यासाठी मोठी किंमत मोजण्यास तयार असतात.
जर तुमच्याकडे जुन्या नोटा किंवा नाणी पडून असतील तर त्या फेकून देण्याऐवजी त्या तपासा. कदाचित त्यात ७८६ हा क्रमांक असेल आणि तो तुमचे नशीब बदलू शकेल. लोक ऑनलाइन लिलावात या नोटा सहज खरेदी करत आहेत. हा एक सोपा मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही घरी बसून लाखो रुपये कमवू शकता.ऑनलाईनशिवाय ऑफलाईनही काही मार्ग आहेत, जे तुम्हाला शोधावे लागतील. कदाचित ऑनलाईनपेक्षा जास्त किंमत तुम्हाला ऑफलाईनला मिळू शकेल.