शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

जबरदस्त! पाटलांच्या पोराची बातच न्यारी; हात नसतानाही जोपासतोय चित्रकलेची आवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 12:37 IST

जन्मल्यापासूनच गोकर्ण पाटील यांना आपले दोन्ही हात नव्हते. 

इच्छा तेथे मार्ग असं म्हणतात. जर खरंच एखादी गोष्ट तुम्हाला मनापासून करायची असेल तर कतीही अडथळे येऊदे.  प्रयत्न केल्याने ती गोष्ट मिळाल्याशिवाय राहत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका हूरहुन्नरी कलाकाराबद्दल सांगणार आहोत. छत्तीसगडचा रहिवासी असलेल्या गोकर्ण पाटील यांच्या संघर्षाबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जन्मल्यापासूनच गोकर्ण पाटील यांना आपले दोन्ही हात नव्हते. 

गोकर्ण पाटील यांना चित्रकलेची आवड लहानपणापासून होती. हात नसल्यामुळे गोकर्ण यांना चित्र काढणं किंवा कोणतंही काम हाताने करणं शक्य नव्हते. तरीही परिस्थितीवर मात देत गोकर्ण पायाने चित्र काढायला शिकले. त्यामुळे त्यांना आपली स्वप्न पूर्ण करता आली. कालांतराने गोकर्ण यांच्या चित्रकलेचे सर्वत्र कौतुक होऊ लागले. 

सध्या गोकर्ण यांच्या चित्रकलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आईएएस अधिकारी प्रियांका शुक्ला यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. गोकर्ण पाटील यांची पूर्ण माहिती प्रियंका शुक्ला यांनी ट्विटरवर दिली आहे. इतकंच नाही तर आपल्या यांच्या चित्रांचे व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

या व्हिडीओमध्ये गोकर्ण पाटील चित्र रंगवण्याचा ब्रश आपल्या पायाच्या बोटांनी पकडत काम करत आहेत. विशेष म्हणजे गोकर्ण पाटील हे ऐकू शकतं नाही. पण त्यांनी स्वतःच्या आत्मविश्वासाच्या जोरावर एक वेगळं नाव लौकिक मिळवले आहे. अनेकांसाठी गोकर्ण पाटील प्रेरणादायी ठरले आहेत. या व्हिडीओला आत्तापर्यंत ३८ हजारांपेक्षा जास्त व्हिव्हज् मिळाले आहेत. तसंच ४०० पेक्षा जास्त रिट्विट्स आणि २ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. 

खोदकाम करताना मजूराला सापडला खजिना, मडक्यात जे दिसलं ते पाहून लोक झाले अवाक्...

क्या बात! वैज्ञानिकांना पृथ्वीखाली सापडलं 600 मैल मोठं लपलेलं स्ट्रक्चर, काय काय होणार उलगडा?

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीpaintingचित्रकला