शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

थरारक! बसनं मागून धडक देताच २ जण ट्रॅक्टरमधून खाली पडले; अन् मग घडलं असं काही; पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 19:17 IST

रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये निजामपूर रस्त्यावर बस आणि ट्रॅक्टरच्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सोशल मीडियावर नेहमीच दुर्घटनांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. रस्ते अपघातांकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. प्रसंगावधान न बाळगल्यानं पुन्हा पुन्हा दुर्दैवी प्रकार घडत असतात. अश्याच एका धक्कादायक प्रकारचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये निजामपूर रस्त्यावर बस आणि ट्रॅक्टरच्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बसने धडक दिल्यामुळे ट्रॅक्टरमध्ये बसलेले तरुण खाली पडले आणि चाकाखाली सापडले.

या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सगळ्याच्याच अंगावर काटा येईल. टेंभेवाड्याजवळ आज सकाळी हा अपघात झाला आहे. नगर पंचायत हद्दीत कचरा गोळा करणाऱ्या ट्रॅक्टर जात होता. टेंभेवाड्याजवळ पोहोचल्यानंतर निकम शाळेच्या बसने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. पण, यात बसने ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली.

तब्बल ११ महिन्यांनंतर कोमातून बाहेर आला तरूण; कोरोनाबद्दल काहीच माहीत नव्हतं, अन् मग....

या प्रकरानंतर ट्रॅक्टरमध्ये चालकाच्या बाजूला बसलेले  दोन तरुण खाली पडले आणि त्यातील एका तरुणाच्या अंगावरून ट्रॅक्टर ट्रॉलीचे चाक गेले त्यानंतर हे दोघे खाली कोसळतात. समोर आलेल्या माहितीनुसार स्थानिकांनी या दोघांनाही दवाखान्यात नेलं. पण दुर्दैवानं उचारादरम्यान त्यातील एकाचा मृत्यू झाला. या घटनेचे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज रेकॉर्ड झाले आहे. 

बापरे! १० वर्षांपासून दारू प्यायचा; घास गिळायला त्रास झाल्यानंतर एक्स रे पाहून डॉक्टर चक्रावले

कचरा गोळा करणाऱ्या महेश सकपाल (वय 19) असं या मृत्यू कामगाराचे नाव आहे. तर जयेश जाधव (वय 22) नावाचा कामगार हा जखमी झाला आहे.  या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.  पोलिसांना घटनास्थळी  पोहोचून संपूर्ण प्रकाराची माहिती  घेत कारवाईला सुरूवात केली आहे. या प्रकरणात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलMaharashtraमहाराष्ट्रRaigadरायगडAccidentअपघात