देव तारी त्याला कोण मारी! चिमुकलीसाठी लहानगा बनला देवदूत, नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 02:53 PM2024-04-03T14:53:02+5:302024-04-03T14:57:04+5:30

सोशल मीडियावर लहान मुलांचं कुतूहल वाटावं असे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.

cctv captured the moment a heroic boy saves a girl who jumped into a pool without knowing how to swim video goes viral on social media | देव तारी त्याला कोण मारी! चिमुकलीसाठी लहानगा बनला देवदूत, नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक 

देव तारी त्याला कोण मारी! चिमुकलीसाठी लहानगा बनला देवदूत, नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक 

Social Viral : सोशल मीडियावर लहान मुलांचं कुतूहल वाटावं असे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. त्यांचा तो अभ्यासूपणा तसेच जिज्ञासू वृत्ती अचंबित करणारी असते. असे लहानग्यांचे वेगवेगळे व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत असतात, ज्यामुळे आपलं देखील मनोरंजन होतं. सध्या असाच एका व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. व्हिडिओमध्ये पाण्यात बुडणाऱ्या एका लहान मुलीचे प्राण वाचवणाऱ्या या मुलावर नेटकरी स्तुतीसुमने उधळत आहेत.

इंस्टाग्रामवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओला नेटकरी तुफान प्रतिसाद देत आहेत. यामध्ये एक लहान मुलगी पोहण्याचं धाडस करत स्विंमिंग पूलमध्ये स्लाईडिंगच्या साहाय्याने पाण्यात जाते. पण पोहता येत नसल्यानं ही लहान मुलगी पाण्यात बुडते. त्याक्षणी स्विमिंगपूलमध्ये पोहत असणारा एक लहान मुलगा हे सगळं पाहाताना दिसतोय. पण साहस करणाऱ्या मुलीचा जीव संकटात सापडल्याचं स्पष्टपणे दिसतं. तेवढ्यात  क्षणाचाही विलंब न करता तिथेच पोहत असणारा लहान मुलगा तातडीने त्या बुडणाऱ्या मुलीच्या मदतीला धावून जातो आणि त्या मुलीला सुखरूप पाण्याच्या बाहेर काढताना दिसतो. दरम्यान, ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद करण्यात आली. अंगाचा थरकाप उडवणारा या व्हिडिओ पाहिल्यानंतर पालकांकडून संतापाचा सूर उमटत आहे.


या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मुलीच्या कृत्यावर संताप व्यक्त केला आहे. 'पोहायला येत नाही मग ती तिकडे कशासाठी गेली', असा सवाल देखील काहींनी केल्याचं पाहायला मिळतंय.

Web Title: cctv captured the moment a heroic boy saves a girl who jumped into a pool without knowing how to swim video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.