लग्न होऊन काही महिने झाले, पत्नीला प्रियकरासह बंद खोलीत पकडले, पुढं पतिने उचलले टोकाचे पाऊलं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 17:50 IST2022-12-27T17:45:01+5:302022-12-27T17:50:04+5:30
बिहारमधून एक अनोखी प्रेम कहानी समोर आली आहे. एका पतीला आपल्या पत्नीचे प्रेमसंबंध समजल्यानंतर पतीने मोठं पाऊल उचलले आहे. हे प्रकरण बिहारमधील नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नया टोला परिसरातील आहे.

लग्न होऊन काही महिने झाले, पत्नीला प्रियकरासह बंद खोलीत पकडले, पुढं पतिने उचलले टोकाचे पाऊलं...
बिहारमधून एक अनोखी प्रेम कहानी समोर आली आहे. एका पतीला आपल्या पत्नीचे प्रेमसंबंध समजल्यानंतर पतीने मोठं पाऊल उचलले आहे. हे प्रकरण बिहारमधील नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नया टोला परिसरातील आहे. बिहारमधील कुमडी गावातील रामराज नावाच्या तरुणाने दोन वर्षांपूर्वी सोहंडा येथील रूपा कुमारीसोबत प्रेमविवाह केला होता. दोघेही शहरातील नया टोला परिसरात भाड्याच्या घरात राहतात. पतीचा मिठाई बनवण्याचा व्यवसाय आहे. पत्नी एका नेटवर्किंग कंपनीत काम करण्याची संधी मिळाली.
नोकरी करत असताना पत्नी पाटणा येथील एका तरुणाच्या प्रेमात पडते. पत्नी पतीपासून लपून त्याला भेटते. पती ज्यावेळी बाहेरच्या शहरात असायचा तेव्हा ती महिला तिच्या प्रियकराला घरी बोलवायची. रविवारी पती बाहेरगावी असताना अचानक घरी परतल्यावर पत्नीला प्रियकरासह पाहून पती संतापला. यानंतर पतीने खोलीला बाहेरून कुलूप लावले आणि पोलिसांना बोलावून दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले.
पत्नीच्या प्रेमकरणावर पतीने मोठा निर्णय घेतला. पत्नीचे प्रियकरासोबत लग्न करुन देण्याचा निर्णय पतिने घेतला. पतीच्या सांगण्यावरून पोलीस आता पुढील कारवाई करत आहेत. पत्नीनेही पोलिसांसमोर कबूल केले आहे की, तिचे गेल्या सहा महिन्यांपासून त्या व्यक्तीवर प्रेम होते. तिला त्याच्यासोबत लग्न करायचे आहे. पत्नीच्या या कृत्यामुळे पतीला त्रास होत होता, अखेर, पतीने पत्नीचे लग्न करुन दिले.