ही मनीमाऊ भलतीच भाव खाऊ! कुत्र्याला शिकवला असा धडा की मांजरीच्या वाटेलाच जाणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 14:36 IST2021-10-18T14:32:44+5:302021-10-18T14:36:11+5:30
इकडून तिकडे उड्या मारण्यात हुशार असणारी मांजर अनेकदा कुत्र्याच्या हाती लागतच नाही. मात्र, कुत्र्याला समोर बघातच तिथून पळ काढण्यातच मांजर आपलं भलं समजते. मात्र, सध्या एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात दिसतं की मांजरीवर हल्ला करणारा कुत्रा स्वत:च धुम ठोकुन पळून गेला.

ही मनीमाऊ भलतीच भाव खाऊ! कुत्र्याला शिकवला असा धडा की मांजरीच्या वाटेलाच जाणार नाही
कुत्रा आणि मांजराचं दुश्मनी तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. दोघंही एकमेकांना पाहताच हल्ला करायला सुरुवात करतात. कुत्रा तर मांजर दिसताच तिच्यावर झडप घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र, इकडून तिकडे उड्या मारण्यात हुशार असणारी मांजर अनेकदा कुत्र्याच्या हाती लागतच नाही. मात्र, कुत्र्याला समोर बघातच तिथून पळ काढण्यातच मांजर आपलं भलं समजते. मात्र, सध्या एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात दिसतं की मांजरीवर हल्ला करणारा कुत्रा स्वत:च धुम ठोकुन पळून गेला.
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एका पाळीव कुत्रा घरातच जोरजोराने मांजरीवर भुंकू लागतो. असं वाटतं, की आज हा कुत्रा बाहेर दिसणाऱ्या मांजरीला संपवून टाकेल. अशात घराचा दरवाजा उघडताच हा कुत्रा मांजरीवर हल्ला करण्यासाठी तिच्याकडे धाव घेतो. मात्र तो मांजरीसमोर येताच मांजर त्याच्यावर जोरानं हल्ला करते आणि कुत्र्यालाच तिथून पळ काढावा लागतो.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ tag._.mee नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. या व्हिडिओला लोकांची भरपूर पसंती मिळत आहे. लोक हा व्हिडिओ एकमेकांसोबत शेअर करण्याबरोबरच यावर निरनिराळ्या कमेंटही करत आहेत.