Optical illusion : या फोटोत लपला आहे एक पक्षी, 7 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 09:48 IST2023-06-02T09:45:27+5:302023-06-02T09:48:21+5:30

Optical Illusion : काही फोटोतील गोष्टी लोक लगेच शोधतात तर काहीतील गोष्टी शोधण्यासाठी खूप वेळ लागतो. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक पक्षी शोधायचा आहे.

Can you spot a bird in this picture within 7 seconds optical illusion | Optical illusion : या फोटोत लपला आहे एक पक्षी, 7 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

Optical illusion : या फोटोत लपला आहे एक पक्षी, 7 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

Optical Illusion Challenge: डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणारे अनेक ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. यातून लोकांचं चांगलं मनोरंजन होतं आणि त्यांच्या बुद्धीलाही चांगली चालना मिळते. सोबतच एखाद्या गोष्टीकडे त्यांचा बघण्याचा दृष्टीकोनही कळतो. काही फोटोतील गोष्टी लोक लगेच शोधतात तर काहीतील गोष्टी शोधण्यासाठी खूप वेळ लागतो. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक पक्षी शोधायचा आहे.

तसं तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेला फोटो काही बनवलेलं चॅलेंज नाहीये. हा एक कॅमेरात क्लीक करण्यात आलेला फोटो आहे. ज्यात एक कुठेतरी एक पक्षी लपून बसला आहे. तोच तुम्हाला शोधायचा आहे आणि यासाठी तुमच्याकडे केवळ 7 सेकंदाचा वेळ आहे. 

हा फोटो Reddit वर शेअर करण्यात आला आहे. यात तुम्हाला गवत दिसत आहे जे हिरव्या आणि पिवळ्या रंगाचं आहे. यात कुठेतरी पक्षी लपून बसला आहे. पण बॅकग्राउंडमध्ये ब्लेंड असल्याने तो पटकन दिसत नाहीये. अशात तुमच्यासाठी हे चॅलेंज 7 सेकंदात पूर्ण करणं अवघड काम आहे. आम्हाला आशा आहे की, तुम्ही हे चॅलेंज लगेच पूर्ण कराल.

ज्यांचे डोळे तीक्ष्ण असतील आणि ज्यांना यातील पक्षी दिसला असेल त्यांचे अभिनंदन आणि ज्यांना अजूनही यातील पक्षी दिसला नसेल त्यांच्यासाठी हिंट आहे की, पक्षी फोटोच्या सेंटरला आहे. अजूनही दिसला नसेल तर खालच्या फोटोत उत्तर बघा.

Web Title: Can you spot a bird in this picture within 7 seconds optical illusion