'या' फोटोतील एक मोठी चूक शोधून काढा; कुणालाही लवकरच उत्तर जमलं नाही, तुम्ही पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 17:20 IST2022-05-19T17:18:41+5:302022-05-19T17:20:41+5:30
सध्या सोशल मिडियावर अशीच काही कोडी व्हायरल होत आहेत. ही कोडी अत्यंत सोपी असतात पण काही माणसं ती सोडवता सोडवु शकत नाहीत.

'या' फोटोतील एक मोठी चूक शोधून काढा; कुणालाही लवकरच उत्तर जमलं नाही, तुम्ही पाहा
अनेकदा आपल्या आयुष्यात असे प्रश्न असतात ज्यांची उत्तर अत्यंत सोपी असतात पण आपल्याला सापडत नाहीत. सध्या सोशल मिडियावर अशीच काही कोडी व्हायरल होत आहेत. ही कोडी अत्यंत सोपी असतात पण काही माणसं ती सोडवता सोडवु शकत नाहीत. याचं कारणं आपण प्रश्न नीट समजुन घेत नाही किंवा उत्तराकडे नीट लक्ष देत नाही. आता हेच कोडे घ्या ना? पाहा तुम्हाला उत्तर मिळतंय का?
या कोड्यात १ ते ९ असे अंक विविध रंगांमध्ये लिहिले आहेत आणि इंग्रजीमध्ये यातील चूक शोधा असा प्रश्न विचारण्यात आला आहे. पाहताक्षणी लोक अंक वाचतात. ते नीट क्रमाने आहेत का याची खात्री करुन घेतात. त्यांच्या लक्षात येते अंकांचा क्रम तर नीट आहे. पण मग चुक कुठे आहे? बराच वेळ डोकं खाजवुनही उत्तर मिळत नाही. मग काहीजण रंग कसे रिपिट झाले आहेत, त्यात काही चूक आहे का? याचा देखील विचार करतात.
तुमच्यासोबतही असंच झालं असेल तर आम्ही तुम्हाला चूक सांगतो. चूक अंकांमध्ये नाही तर वर विचारल्या गेलेल्या प्रश्नामध्ये आहे. हा प्रश्न असा आहे की, Can you find the the mistake? यात the हा शब्द रिपीट झाला आहे. आलं का आता लक्षात? मग ही बातमी मित्रमैत्रीणींनाही फॉरवर्ड करा आणि घ्या त्यांची फिरकी.