या फोटोत तुम्हाला शोधायची आहे बाळाची आई, 7 सेकंदाचं आहे चॅलेंज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 12:02 IST2023-07-08T11:53:54+5:302023-07-08T12:02:11+5:30

Optical Illusion : या खेळांमध्ये ऑप्टिकल इल्यूजन फोटोंचा अधिक वापर केला जातो. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ही एक पेंटिंग आहे ज्यात तुम्हाला एक आई शोधायची आहे. 

Can you find baby mother in optical illusion quiz image | या फोटोत तुम्हाला शोधायची आहे बाळाची आई, 7 सेकंदाचं आहे चॅलेंज!

या फोटोत तुम्हाला शोधायची आहे बाळाची आई, 7 सेकंदाचं आहे चॅलेंज!

Optical Illusion : सोशल मीडियावर वेगवेगळे खेळ खेळले जातात, हे खेळ फार मनोरंजकही असतात. यात मेंदुची आणि डोळ्यांची कसरतही होते. सोबतच तुमचा मुडही फ्रेश होतो. या खेळांमध्ये वेगवेगळे चॅलेंज दिले जातात. या खेळांमध्ये ऑप्टिकल इल्यूजन फोटोंचा अधिक वापर केला जातो. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ही एक पेंटिंग आहे ज्यात तुम्हाला एक आई शोधायची आहे. 

तुमच्या समोर असलेल्या फोटोत तुम्हाला एक बाळाची आईची शोधायची आहे. हे काम तुम्हाला केवळ 7 सेकंदात करायचं आहे. या फोटोत एक बाळ दाखवण्यात आलं आहे जो दुधाची बॉटल पकडून आहे. पण यात बाळाची आई नाहीये. पण ती आहे. जी तुम्हाला शोधायची आहे. 

जर 7 सेकंदात तुम्हाला बाळाची आई सापडली नसेल तर निराश होण्याची गरज नाही. कारण तिला शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहोत. 

जर तुम्हाला बाळाची आई शोधायची असेल तर समोर असलेला फोटो जरा राइट साइडला फिरवा. तेव्हाच तुम्हाला त्याची आई दिसून येईल. खालच्या फोटोत तुम्ही तिला बघू शकता. 

Web Title: Can you find baby mother in optical illusion quiz image