घोड्यासारखा पाय वर उचलून उंटाचा तूफान डान्स, कधीच पाहिला नसेल असा व्हिडीओ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 17:24 IST2023-06-21T17:23:34+5:302023-06-21T17:24:12+5:30
Camel Dance Video : तुम्ही लग्नात किंवा अजून कुठे घोडीला असा डान्स करताना नक्कीच पाहिलं असेल, पण उंटाचा असा व्हिडीओ नक्कीच पाहिला नसेल.

घोड्यासारखा पाय वर उचलून उंटाचा तूफान डान्स, कधीच पाहिला नसेल असा व्हिडीओ!
Camel Dance Video : सोशल मीडियावर नेहमीच काहीना काही व्हायरल होत असतं. कधी काय बघायला मिळेल काहीच सांगता येत नाही. कधी कधी तर काही व्हिडीओ हैराण करून सोडतात तर काही व्हिडीओ चेहऱ्यावर हसू आणतात. सध्या असाच एक व्हिडीओ लोकांना अवाक् करत आहे. ज्यात एक उंट दोन्ही पाय वर उचलून नाचताना दिसत आहे. तुम्ही लग्नात किंवा अजून कुठे घोडीला असा डान्स करताना नक्कीच पाहिलं असेल, पण उंटाचा असा व्हिडीओ नक्कीच पाहिला नसेल.
सोशल मीडियावर लोक स्वत:सोबतच वेगवेगळ्या प्राण्यांचे अजब अजब व्हिडीओ शेअर करत असतात. उंट हा प्राणी फारच शांत वाटतो. वाळवंटातील वाळूमध्ये तो डौलात चालत असतो. पण त्याचे धावतानाचे व्हिडिओही तुम्ही पाहिले असतील. पण उंटाचा डान्स करतानाचा व्हिडीओ नसेल पाहिला. या व्हिडिओत उंट एका खाटेवर दिसत आहे. ज्यावर बसून उंट डान्स करत आहे. आजूबाजूला लोक त्याचा डान्स बघत आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टावर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्याला आतापर्यंत 6 हजारांपेक्षा जास्त लाइक मिळाले आहेत. 4 दिवसांआधी शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, ऊंटाचा डान्स. हा व्हिडीओ लोकांना खूप आवडत आहे आणि पसंत केला जात आहे.