एक जंगली रेडा सिंहांच्या कळपावर पडला भारी, सिंह गेले पळुन! विश्वास नसेल तर पाहा video
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 20:14 IST2022-08-11T20:11:41+5:302022-08-11T20:14:20+5:30
जंगलाचा राजा सिंहालाही टक्कर देणारा एक प्राणी आहे तो म्हणजे रेडा. एकटा रेडा सिंहांच्या कळपावरही भारी पडला आहे.

एक जंगली रेडा सिंहांच्या कळपावर पडला भारी, सिंह गेले पळुन! विश्वास नसेल तर पाहा video
सिंह ज्याला जंगलाचा राजा म्हटलं जातं. भलेभले प्राणी त्याच्याशी पंगा घेण्याची हिंमत करत नाही. सिंह येताना दिसताच आपला जीव वाचवण्यासाठी दूर पळतात. सिंहाला कोणताच प्राणी टक्कर देऊ शकत नाही, असं सर्वांना वाटतं. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर हा आपला फक्त गैरसमज आहे, असंच वाटेल. कारण जंगलाचा राजा सिंहालाही टक्कर देणारा एक प्राणी आहे तो म्हणजे रेडा. एकटा रेडा सिंहांच्या कळपावरही भारी पडला आहे.
एक चवताळलेला रेडा थेट सिंहांच्या कळपात घुसला. त्यानंतर त्याने कळपात घुसूनच जंगलाच्या राजावर हल्ला केला आहे. साथीदाराची शिकार करणाऱ्या सिंहांना रेड्याने चांगलीच अद्दल घडवली आहे. त्यांच्या कळपात घुसत एका सिंहाला शिंगावर घेऊन हवेत उडवत जमिनीवर आपटून आपटून मारलं आहे. त्याचं रौद्र रूप पाहून इतर सिंहांनी त्याच्या जवळ येण्यातीही हिंमत केली नाही.
व्हिडीओत पाहू शकता एक रेडा सिंहांच्या कळपात अडकला आहे. सिंहांनी त्याला घेरलं आहे आणि त्याची शिकार करण्याच्या तयारीत आहे. त्याला वाचवण्यासाठी दुसरा रेडा तिथं धावत येतो. एका सिंहाला तो आपल्या शिंगावर घेतो आणि उडवून जमिनीवर आपटतो. रेडा इतक्या भयंकर पद्धतीने हल्ला करतो की सर्व सिंह तिथून दूर पळतात. आपला जीव वाचवण्यासाठी त्यांची पळापळ सुरू होते. त्या सिंहाला वाचवण्याची हिंमत कुणीच करत नाही.
बराच वेळ रेडा सिंहावर हल्ला करत राहतो. त्यानंतर सिहांच्या कळपाने घेरलेला रेडा तिथून पळ काढताच हा रेडा त्या सिंहाला सोडतो आणि तिथून पळून जातो. ज्या सिंहावर हल्ला केला तो सिंहसुद्धा किती बिथरला आहे ते तुम्ही व्हिडीओच्या शेवटी पाहूच शकता. कळपाने असलेल्या सिंहांपैकी एकही सिंह पुन्हा त्या रेड्याच्या मागे जाण्याची, त्याचा पाठलाग करण्याची हिंमत करत नाही.
Travel Explore Protect नावाच्या युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.