"भाई, ती मुलगी नाही...एक पंजा अन्...!"; थेट वाघोसोबतच 'लिप लॉक' करताना दिसला तरुण, Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 09:37 IST2025-10-09T09:34:47+5:302025-10-09T09:37:22+5:30
सोशल मीडिया यूजर्सनी या व्हिडीओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत...

"भाई, ती मुलगी नाही...एक पंजा अन्...!"; थेट वाघोसोबतच 'लिप लॉक' करताना दिसला तरुण, Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल
सोशल मीडियावर सातत्याने नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ ज्ञान वाढवणारे असतात, काही एखाद्या विषयावर विचार करायला लावणारे असतात, काही गमतीशीर असतात, काही थरकाप उडवणारे असतात तर काही थक्क करणारेही असतात. असाच थक्क करणारा एक व्हिडिओ सध्या सोशळ मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यात एक व्यक्ती थेट एका वाघासोबत लिप लॉक करताना दिसत आहे. हा अतिधोकादायक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती वाघाच्या अगदी जवळ बसून त्याच्यासोबत 'लिप लॉक' करताना दिसत आहे. वाघही अत्यंत शांतपणे पंजे पसरून त्या व्यक्तीला मिठी मारत असल्याचा हा क्षण अनेकांना स्तब्ध करणारा आहे. सामान्यतः वाघाचे नाव ऐकून लांब पळणारे लोक, या व्यक्तीचे वाघावरील बेधुंद प्रेम पाहून आश्चर्यचकित होत आहेत.
हा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत असला तरी, वन्यप्राण्यांसोबतचे असे वर्तन कधीही अनपेक्षितपणे जीवघेणे सिद्ध होऊ शकते. मात्र, हा व्हिडिओ माणूस आणि वन्यजीव यांच्यातील विश्वास आणि प्रेम दर्शवणाराही आहे. मात्र, अशा कृतीमुळे उद्भवू शकणारे जीवघेणे परिणाम दुर्लक्षित करता येणार नाहीत.
हा व्हिडिओ Mihal Tiger या फेसबुक पेजवरून शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडिया यूजर्सनी या व्हिडीओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने, 'भाई, ती मुलगी नाही, वाघ आहे, एक पंजा आणि खेळ खल्लास', अशी कमेंट केली आहे. तर आणखी एकाने, 'गर्लफ्रेंडपेक्षा वाघावर प्रेम करणे बरे,' अशी मिश्किल प्रतिक्रिया दिल्या आहेत. याशिवाय इतरही अनेकांनी हा धोकादायक प्रकार असल्याचे म्हटले आहे.