आजोबांची कबर बघण्यासाठी इंग्लंडहून भारतात आलं ब्रिटिश कुटुंब, पाहा त्यांना कबर सापडली की नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 15:42 IST2026-04-08T15:42:19+5:302026-04-08T15:42:57+5:30

सध्या एक व्हिडीओ व्हायरल झालाय, ज्यात इंग्लंडहून आलेल्या एका परिवाराला दाखवण्यात आलंय. पण हा परिवार भारतात फिरायला नाही तर आपल्या आजोबांची कबर बघण्यासाठी आले होते. 

British tourist comes in India for visit grandfathers grave watch video | आजोबांची कबर बघण्यासाठी इंग्लंडहून भारतात आलं ब्रिटिश कुटुंब, पाहा त्यांना कबर सापडली की नाही

आजोबांची कबर बघण्यासाठी इंग्लंडहून भारतात आलं ब्रिटिश कुटुंब, पाहा त्यांना कबर सापडली की नाही

Viral Video : पर्यटनासाठी लोकप्रिय असलेल्या जगातील देशांमध्ये भारताचा देखील वरचा क्रमांक लागतो. देशातील संस्कृती, ऐतिहासिक स्मारकं, किल्ले, महाल, मंदिरे, डोंगर आणि येथील जेवणाचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक भारतात येतात. देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन ते येथील गोष्टी बघतात आणि त्यांचा आनंद घेतात. त्यांचे अनेक व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. सध्या एक व्हिडीओ व्हायरल झालाय, ज्यात इंग्लंडहून आलेल्या एका परिवाराला दाखवण्यात आलंय. पण हा परिवार भारतात फिरायला नाही तर आपल्या आजोबांची कबर बघण्यासाठी आले होते. 

हा अनोखा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @ugust_traveller नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आलाय. व्हिडिओत एका व्यक्ती सांगत आहे की, परदेशी परिवाराने त्याला संपर्क केला होता आणि मदत मागितली होती. या परिवारातील एका व्यक्तीला राजस्थानच्या दौसा येथील बांदीकुई गावात असलेली आपल्या आजोबांची कबर बघायची होती. नंतर त्याने बांदीकुईमधील जुनं चर्च शोधून काढलं. जेव्हा परिवारातील व्यक्तीने काही कागदपत्रे दाखवली तेव्हा दिसलं की, दिसलं की, ते अनेक वर्षांपासून तिथे येण्याचा प्रयत्न करत होते. मोठ्या प्रयत्नांनंतर जेव्हा ते पुढे गेले तेव्हा एक स्माशनभूमी त्यांना दिसली. पण दुर्दैवाने त्यांना त्यांच्या आजोबांची कबर मिळाली नाही. पण परिवारातील एक व्यक्ती एका कबरीजवळ बराच वेळ थांबली, जणू ती कबर त्याच्या आजोबाचीच असेल.


या व्हिडिओच्या कॅप्शनला लिहिण्यात आलंय की, 'इंग्लंड ते भारत...सगळ्यात महान कहाणी. जेव्हा आपण एखादी महान कहाणी बघतो तेव्हा भावनांचा बांध फुटतो. कल्पना करा की, इंग्लंडहून एक जोडपं आपल्या आजोबांची समाधी बघण्यासाठी भारतात येतं, आजोबांचा मृत्यू ८० वर्षाआधी झाला होता. हे एखाद्या सिनेमाच्या कथेप्रमाणे आहे. पण ही कहाणी जवळून पाहिली'.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्सनी सुद्धा यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. एका यूजरने लिहिलं की, 'माझ्या वडिलांनी अलिकडेच बांगलादेशमध्ये जाऊन आमचं जुनं घर आणि आजोबा शिकले ती शाळा शोधली होती'. दुसऱ्याने लिहिलं की, 'मी पूर्ण व्हिडीओ यूट्यूबवर पाहिला. तू फार चांगलं काम केलंय'. तर काही लोकांनी ब्रिटिशांवर टिका करणाऱ्या कमेंट्स केल्यात.

Web Title : ब्रिटिश परिवार दादाजी की कब्र ढूंढने भारत आया, खाली हाथ लौटा।

Web Summary : एक ब्रिटिश परिवार अपने दादाजी की कब्र ढूंढने राजस्थान, भारत आया, जिनकी 80 वर्ष पहले मृत्यु हो गई थी। एक स्थानीय व्यक्ति की मदद से, उन्होंने बांदीकुई, दौसा में एक पुराना चर्च और कब्रिस्तान खोजा। प्रयासों और पुराने दस्तावेजों के बावजूद, उन्हें कब्र नहीं मिली, पर उस स्थान से जुड़ाव महसूस हुआ।

Web Title : British family travels to India seeking grandfather's grave, finds nothing.

Web Summary : A British family journeyed to Rajasthan, India, searching for their grandfather's grave, who died 80 years ago. Guided by a local, they located an old church and cemetery in Bandikui, Dausa. Despite their efforts and old documents, they couldn't find the exact grave, but felt a connection to the place.