भर मंडपातच घेतला नवरीचा गैरफायदा, नवरा सोडून भलत्यानेच केलं किस...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 15:01 IST2021-08-01T14:56:40+5:302021-08-01T15:01:50+5:30
या व्हिडिओत भर लग्नांच्या मंडपातच नवऱ्यामुलीसोबत असं काही झालं की बिचारीला तोंड लपवणं मुश्कील झालंय...

भर मंडपातच घेतला नवरीचा गैरफायदा, नवरा सोडून भलत्यानेच केलं किस...
लग्नातील वधू वरांच्या अनेक व्हिडिओंची सोशलमिडियावर रेलचेल असते. यातील अनेक व्हिडिओ तुम्हाला पोट धरुन हसायला लावत असतील. मात्र हा एक असा व्हिडिओ आहे जो पाहुन तुम्हाला जबरदस्त धक्का बसेल. या व्हिडिओत भर लग्नांच्या मंडपातच नवऱ्यामुलीसोबत असं काही झालं की बिचारीला तोंड लपवणं मुश्कील झालंय...
भारतीय लग्न म्हणजे असंख्य परंपरा आणि चालीरीती. या परंपरा पूर्ण करताना वधु-वरांची पूर्ण दमछाक होते. मग अशातच मंडपात डुलकी लागते. एका वधुला मंडपात अशीच डुलकी लागते पण तिच्या डुलकीचा गैरफायदा कुणी तिसऱ्यानेच घेतला...
या व्हिडिओमध्ये दिसतं, की लग्नसमारंभ सुरू आहे, नवरदेव आणि नवरी मंडपात बसलेले आहेत. इतक्यात नवरीबाईला झोप येऊ लागते आणि ती बसल्या बसल्याच झोपी जाते. एक महिला तिला उठवण्याचा प्रयत्न करते, मात्र नवरी जास्तच गाढ झोपेत असते.
मागे बसलेला एक व्यक्ती जसं काय याच गोष्टीची वाट पाहत होता. तो अचानक नवरीला किस करतो. व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना असं म्हटलं गेलं आहे. मात्र, तो नवरीच्या जवळच बसलेला असल्यानं जवळचा कोणीतरी नातेवाईक असावा, असा अंदाज लावला जात आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर निरंजन महापात्रा नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा मजेशीर व्हिडिओ आतापर्यंत १९ हजारहून अधिकांनी पाहिला आहे.