लग्नात दारु ढोसून आलेल्या नवरदेवाला नवरीने चांगलाच धुतला आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 02:07 PM2023-12-28T14:07:35+5:302023-12-28T14:08:35+5:30

भर लग्न मंडपात विधी चालू असताना नवरीने नवरदेवाच्या कानशिलात लगावली.

bride slam groom in wedding for smelling alcohol in his mouth video goes viral on social media  | लग्नात दारु ढोसून आलेल्या नवरदेवाला नवरीने चांगलाच धुतला आणि मग...

लग्नात दारु ढोसून आलेल्या नवरदेवाला नवरीने चांगलाच धुतला आणि मग...

Viral Video : लग्न हा प्रत्येकाच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण असतो.  आपल्या लग्नातील प्रत्येक क्षण कायम लक्षात राहावा याकरिता प्रत्येकाची धडपड सुरु असते. दोन व्यक्ती त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात करत संपूर्ण आयुष्य सोबत राहण्याची वचने एकमेकांना देतात. याला सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ अपवाद ठरलाय. 

भर लग्न मंडपात विधी चालू असताना नवरीने नवरदेवाच्या कानशिलात लगावली. त्यामुळे लग्न समारंभात आलेल्या प्रत्येकाला धक्काच बसला. घडल्या प्रकाराने लग्न मंडपात एकच खळबळ उडाली. ऐन लग्नाच्यावेळी दारु पिऊन आल्याने राग अनावर झालेल्या नवरीने नवरगदेवाला चांगलाच चोप दिल्याचे व्हिडीओतून दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा मजेशीर व्हिडीओ चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. नवरीचे रागीट रुप पाहून नवरदेव चांगलाच घाबरलेला दिसतोय. 
 
व्हायरल व्हिडीओमध्ये लग्न समारंभाला आलेल्या नातेवाईकांनी मंडप खचाखच भरलेला आहे. सर्व काही सुरळीत पार पडत असताना अचानक नवरदेवाने गळ्यात वरमाला टाकताच दारुचा वास आल्याने नवरी संतापली आणि तिचा पार चढला. गळ्यात वरमाला टाकताच नवरीने त्याच्या कानशिलात सटासट लगावल्या. घडला प्रकार पाहून मंडपात उपस्थित प्रत्येकजण अचंबित झाला आहे. काय बोलावे तेच कोणाला कळत नव्हते. लग्न मंडपात काही काळ स्मशान शांतता पसरली होती.आपल्या लग्नाच्या दारु ढोसून आल्याने नवरी बाईंनी चक्क राडाच केला. गळ्यातील वरमाळेनेच नवरदेवाला मारत नवरी लग्न मंडपातून पळ काढते. 

 हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी  नवरीच्या धाडसाचे कौतुक केले आहे. 

पाहा व्हिडीओ - 

Web Title: bride slam groom in wedding for smelling alcohol in his mouth video goes viral on social media 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.