सासरकडून मिळालेले कपडे घालण्यास नवरदेवाने दिला नकार; नवरीच्या घरच्यांनी केली बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 16:43 IST2022-07-08T16:42:05+5:302022-07-08T16:43:59+5:30
बिहारच्या नालंदामध्ये लग्नादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे, जिथे सासरच्या मंडळींनी जावयाचे स्वागत एका अनोख्या पद्धतीने केले आहे.

सासरकडून मिळालेले कपडे घालण्यास नवरदेवाने दिला नकार; नवरीच्या घरच्यांनी केली बेदम मारहाण
नालंदा । बिहारच्या नालंदामध्ये लग्नादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे, जिथे सासरच्या मंडळींनी जावयाचे स्वागत एका अनोख्या पद्धतीने केले आहे. ज्याची पंचक्रोशीत मोठी चर्चा रंगली आहे कारण नवरीकडील मंडळींनी क्षुल्लक कारणावरून लग्नात मोठी बाधा आणली. खर तर लग्न समारंभात सासरच्या मंडळींकडून मुलाला मिळालेले कपडे परिधान न केल्याने सासरच्यांनी आपल्या होणाऱ्या जावयाला बेदम मारहाण केली. ही घटना नालंदा जिल्ह्यातील बिहार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबा मणिराम आखाड्याची आहे. जिथे लग्नाच्या वेळी हुंड्यात दिलेले कपडे न घातल्याने वराला आणि त्याच्या कुटुंबाला मोठ्या समस्येचा सामना करावा लागला.
दरम्यान, मुलगा सुरज कुमारचे लग्न मणिराम आखाडा इथे होत होते. सुरज नवरीला घेऊन दिपनगर येथून मणिराम आखाड्याला पोहचला होता. सगळीकडे लग्नाची धावपळ चालू होती. लग्नाचे विधीही सुरू होते, यावेळी मुलीच्या बाजूच्या लोकांनी नवरदेवाला हुंड्याचे कपडे घालण्यास सांगितले. मात्र नवरदेवाने कपडे घालण्यास नकार दिल्याने मुलीकडील मंडळींनी वराला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली.
बचावाला आलेल्या मंडळीलाही केली मारहाण
या घटनेदरम्यान वराची आई आणि त्याचे कुटुंबीय मदतीला आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. या हाणामारीच्या घटनेत फक्त नवरदेवच नाही तर त्याची आई, वराचा भाऊ आणखी चार जण जखमी झाले. अशा तयारीत वरमंडळी लग्नासाठी निघाली होती, मात्र लग्नापूर्वीच उपचारासाठी रूग्णालयात धाव घ्यावी लागली. या घटनेमुळे लग्नामध्ये बराच व्यत्यय आला मोठ्या मानसन्मानानंतर लग्न पार पाडले. दरम्यान या अनोख्या लग्नाची चर्चा सर्वत्र रंगली आहे.