शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

लग्नापूर्वीच नवरदेवाने जीभ टाळ्याला लावली! मुलीकडच्यांनी आधी झाडाला बांधले, मग झोडपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 15:46 IST

लग्नाच्या ठिकाणी वधूकडचे मंडळी आणि वराकडचे मंडळी यांच्यात जोरदार हाणामारी सुरू होते.  

सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. या वर्षीतील  लग्नाचे शेवटचे काहीच मुहूर्त शिल्लक असल्याने आता सगळीकडे गडबड सुरू असल्याचं दिसतं आहे. उत्तर प्रदेशमधून एका लग्नासंदर्भातच एक बातमी समोर आली आहे, एका लग्नात लग्नासाठी वराती येतात. लग्न मंडपात लग्नाची गडबड सुरू असते. लग्नाची वेळ काही मिनिटांवरच येऊन ठेपते. तेवढ्यात लग्नाच्या ठिकाणी वधूकडचे मंडळी आणि वराकडचे मंडळी यांच्यात जोरदार हाणामारी सुरू होते.  हे प्रखरण शेवटी पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी वराला अटक केली आहे.

"लोकांना माझी लिपस्टिक पाहून...", कर्नाटकातील महिला कॉंग्रेस नेत्याने टीकाकारांना सुनावले

मिळालेली माहिती अशी, लग्न काही दिवसापूर्वीच ठरले होते. १४ जून २०२३ रोजी संध्याकाळी राम किशोर वर्मा यांच्या मुलीच्या लग्नाची मिरवणूक प्रतापगढच्या मांधाता कोतवाली येथील हरखपूर गावात जौनपूर जिल्ह्यातील सक्रा लोडा गावातून आली होती. वर अमरजीत वर्मा यांचा मुलगा रामसिंग वर्मा वराती घेऊन सकरा गावात पोहोचले होते. सायंकाळी द्वारपूजनाचा विधी संपन्न झाला.त्यांच्या लग्नाचा विधी सुरू असतानाच वधू-वरांच्या बाजूने वाद झाला. दोन्ही बाजूकडील मंडळींमध्ये वादावाद सुरू झाली. 

यावेळी वधुकडच्या मंडळींना वराकडच्या मंडळीना मारहाण सुरू केली. त्यांना ओलीस ठेवले आणि वराला घराबाहेरील झाडाला दोरीने बांधले, तसेच मारहाण करून या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. मांधाता पोलीस स्टेशनचे प्रभारी पुष्पराज सिंह इतर पोलिसांसह गावात पोहोचताच त्यांना शेरवानी घातलेल्या वराला झाडाला बांधलेले दिसले. वधूच्या कुटुंबीयांनी सांगितले की, विधींच्या दरम्यानच वराने हुंड्याची मागणी करण्यास सुरुवात केली होती यामुळे आम्ही यांना मारहाण केली.

यानंतर दोन्हीकडच्या मंडळींना पोलीस ठाण्यात आणले. वराला पोलिसांनी अटक केली. यावेळी दोन्ही बाजूचे लोक पोलीस ठाण्यात होते. मात्र, त्यांच्यात कोणताही तोडगा निघाला नाही. वराने हुंडा मागितला होता आणि त्याच्या मित्रांनीही कोणाशीतरी गैरवर्तन केल्याचे सांगितले जात आहे. यानंतर प्रकरण वाढले आणि दोन्ही बाजूंमध्ये हाणामारी झाली. 

टॅग्स :marriageलग्नSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेPoliceपोलिस