VIDEO : माहेर सोडून सासरी जायला तयार नव्हती नवरी, मग घरातील सदस्यांनी केलं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 12:03 IST2024-10-24T11:50:26+5:302024-10-24T12:03:15+5:30
Viral Video : आधी तर नवरी रडत रडत घरातून बाहेर येताना दिसते. पण नंतर ती अचानक थांबते आणि बाहेर जाण्यास नकार देते.

VIDEO : माहेर सोडून सासरी जायला तयार नव्हती नवरी, मग घरातील सदस्यांनी केलं असं काही...
Viral Video : आजकाल सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात लग्नाचे व्हिडीओ सगळ्यात जास्त व्हायरल होताना दिसतात. कधी हे व्हिडीओ पोटधरून हसायला लावणारे तर कधी हे व्हिडीओ भावूक करणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एका नवरीला अनोख्या पद्धतीने सार केलं जात आहे.
लग्नानंतर नवरीची पाठवणी करतात तेव्हाचा क्षण सगळ्यांनाच भावूक करणारा असतो. जेव्हा नवरी आपलं माहेर सोडून सार जात असते तो क्षण कुणासाठीही सामान्य नसतो. यात तुम्ही बघू शकता की, नवरी आई, भाऊ, वडिलांना बिलगून रडत आहे.
आधी तर नवरी रडत रडत घरातून बाहेर येताना दिसते. पण नंतर ती अचानक थांबते आणि बाहेर जाण्यास नकार देते. त्यानंतर घरातील लोक तिला कसंतरी बाहेर आणतात. पण तरीही नवरी जाण्यास तयार नाही.
ये ह्रदय विदारक दृश्य मुझसे तो देखा भी नहीं जा रहा है 😭😭😭😭😭😭😜😉 pic.twitter.com/URjGEjpu4j
— RJ_RIYA📻 (@24karattgold1) October 21, 2024
अशात घरातील महिला म्हणतात की, तिला उचलून गाडीत घेऊन जा. त्यानंतर नवरीचा भाऊ तिला खांद्यावर उचलतो आणि गाडीत नेऊन बसवतो. यादरम्यान नवरी जोरजोरात ओरडते आणि खाली उतरण्याचा हट्ट करते.
तसा तर हा इमोशनल करणारा व्हिडीओ आहे. पण सोशल मीडियावर लोक हा व्हिडीओ हसत आहे. तसेच वेगवेगळ्या कमेंट्सही करत आहे. काहींनी व्हिडिओची खिल्ली उडवली आहे.