नादखुळा डान्स! नव्या नवरीसोबत कुत्र्याने असा काही केला डान्स व्हिडीओ झाला व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 16:48 IST2019-06-25T16:42:13+5:302019-06-25T16:48:03+5:30

कमाल डान्स केला ना या कुत्र्याने? याआधी क्वचितच तुम्ही कधी एखाद्या कुत्र्याला इतका भारी डान्स करताना पाहिले असेल.

Bride dancing with dog on DJ floor best first dance you will see today viral video | नादखुळा डान्स! नव्या नवरीसोबत कुत्र्याने असा काही केला डान्स व्हिडीओ झाला व्हायरल!

नादखुळा डान्स! नव्या नवरीसोबत कुत्र्याने असा काही केला डान्स व्हिडीओ झाला व्हायरल!

कमाल डान्स केला ना या कुत्र्याने? याआधी क्वचितच तुम्ही कधी एखाद्या कुत्र्याला इतका भारी डान्स करताना पाहिले असेल. असं वाटतंय डीजेवाल्याने त्याचं फेव्हरेट गाणं लावलं असावं आणि हा कुत्रा स्वत:ला नाचण्यापासून रोखू शकला नाही. इतकेच काय तर नवी नवरी सुद्धा त्याची चांगली साथ देताना दिसत आहे. आता तुम्ही म्हणाल काही व्हिडीओ कुठला आहे, कधीचा आहे? तर सध्या त्याची काही माहिती मिळू शकली नाही. पण हा डान्स कुत्र्याचा डान्स लोक चांगलाच एन्जॉय करताना दिसत आहेत.


अभिनेता आणि टीव्हीवरील लोकप्रिय चेहरा रघु रामने हा व्हिडीओ री-ट्विट केला आहे. ही माहिती लिहिली जाईपर्यंत २८ हजारवेळा हा व्हिडीओ पाहिला गेलाय. काहींना आडवला तर काहिंनी शेअर केला.



या व्हिडीओमध्ये लग्नाचं सेलिब्रेशन सुरू आहे. आणि डीजेवर नवरी व हा कुत्रा अफलातून डान्स करत आहेत. दोघेही अशा डान्स मुव्ह्स करत आहेत की, लोक व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघतच आहे. कधी कुत्रा त्याच्या दोन पायांवर उभा राहून नाचतो तर कधी नवरीच्या हातांच्या राऊंडमधून आश्चर्यकारक उडी घेऊन लोकांना आश्चर्याच धक्का देत आहे.

Web Title: Bride dancing with dog on DJ floor best first dance you will see today viral video