शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

लग्नमंडपातच एकमेकांच्या कानशिलात लगावल्या वधुवराने, स्टेजवर केली तुफान हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 18:05 IST

एका व्हिडिओमुळे खळबळ उडाली आहे. यात स्टेजवर उभ्या असलेल्या नवरी आणि नवरदेवाचं छोट्या गोष्टीवरून भांडण होतं आणि यानंतर दोघंही एकमेकांची धुलाई करू लागतात (Bride Groom Fight Video).

कधी कधी लग्नाच्या दिवशीच अशा काही घटना घडतात, ज्यावर विश्वास बसत नाही. बहुतेकदा आपण लग्नाच्या दिवशी नवरी आणि नवरदेवाच्या चेहऱ्यावर हसूच पाहतो आणि ते खूप आनंदी असतात. मात्र, काहीवेळा छोट्याशा चुकीमुळे गोंधळ निर्माण होतो. भारतात लग्नाचा सिझन (Wedding Season in India) सुरू झाला असून आता वेगवेगळ्या प्रकारचे लग्नाचे व्हिडिओ (Wedding Video) समोर येऊ लागले आहेत. सध्या लग्नाच्या अशाच एका व्हिडिओमुळे खळबळ उडाली आहे. यात स्टेजवर उभ्या असलेल्या नवरी आणि नवरदेवाचं छोट्या गोष्टीवरून भांडण होतं आणि यानंतर दोघंही एकमेकांची धुलाई करू लागतात (Bride Groom Fight Video).

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नवरी आणि नवरदेव स्टेजवर उभे असल्याचं पाहायला मिळतं. हार घालताना नवरी नवरदेवाला मिठाई खाऊ घालू लागते, परंतु नवरदेवाचं संपूर्ण लक्ष कॅमेऱ्याकडे आहे. नवरी काही सेकंद थांबते आणि त्याने समोर बघण्याची वाट बघते, परंतु बराच वेळ नवरदेव तिच्याकडे पाहत नाही, यामुळे नवरी चांगलीच भडकते.

यानंतर जे काही घडतं, त्याचा तिथे उपस्थित कोणी विचारही केला नसेल. नवरी रागात नवरदेवाच्या चेहऱ्यावर मिठाई फासते. हे पाहून नवरदेव भडकतो आणि तो नवरीच्या कानशिलात लगावतो. याच्या उत्तरात नवरीही नवरदेवाला चापट मारताना दिसते. यानंतर नवरी आणि नवरदेव अगदी जोरजोरात एकमेकांना चापट मारू लागतात.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक असंही म्हणू लागले आहेत की नवरी-नवरदेवाच्या भांडणाचा हा व्हिडिओ खोटा असून त्यात ते अभिनय करत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. हे प्रकरण कुठलं आहे किंवा या व्हिडिओमागील सत्य काय आहे, याची सध्या तरी पुष्टी झालेली नाही. सोशल मीडियावर लोक हा व्हिडिओ शेअर करत आहेत आणि त्याची खिल्ली उडवत आहेत.

इन्स्टाग्रामवर only._.sarcasm_ नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ अपलोड होताच तो चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ शेअर करत यूजरने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'आजच मारून टाकशील का?'. या व्हिडिओवर यूजर्सनी निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामmarriageलग्न